डोणगाव येथील बांधकाम सापडले वादाच्या भोवऱ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:40 AM2021-08-14T04:40:20+5:302021-08-14T04:40:20+5:30
डोणगाव येथील स्वाभिमानीचे माजी जिल्हा उपाध्यक्ष अमोल वाघमारे यांनी जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देऊन हे बांधकाम पाडण्यात यावे, अन्यथा १५ ...
डोणगाव येथील स्वाभिमानीचे माजी जिल्हा उपाध्यक्ष अमोल वाघमारे यांनी जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देऊन हे बांधकाम पाडण्यात यावे, अन्यथा १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. बांधकामाबाबत तक्रार असल्याने पाडून टाकू, अशी तोंडी धमकी ग्रामविकास अधिकारी व प्रशासक देऊन मानसिक त्रास देत असल्याबाबत डोणगाव येथील शिवाजी नारायण गरड, शुभम वसंता नव्हाळे व सरोज प्रशांत चोपडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. यांना तक्रार देऊन ग्रामविकास अधिकारी व प्रशासक यांच्यावर कारवाई करावी व आमचे बांधकाम पाडू नये व आम्ही सर्व्हे नंबर १२७ मध्ये असून, हे बांधकाम रितसर करून बांधकाम पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायतीने आम्हाला १४ आँगस्टपर्यंत परवानगी द्यावी, अन्यथा आम्ही आमचे सर्व कुटुंबासह आत्मदहन करू, असा इशारा बांधकाम करणाऱ्यांनी दिला आहे.
कारवाईकडे लागले लक्ष
डोणगाव येथील बांधकाम पूर्ण करणे व ते पाडण्यात यावे, अशा वेगवेळ्या दोन मागण्या समोर आल्याने प्रशासनाकडून आता या बांधकामाबाबत काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोघांनाही याबाबत आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
डोणगाव येथील सुरू असलेल्या बांधकामांना रितसर नोटीस बजावली आहे. यामध्ये नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल.
ज्ञानेश्वर चनखोरे, ग्रामविकास अधिकारी, डोणगाव.