पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा तालुक्यातील ३३३, खामगाव ४५, शेगाव ५, देऊळगाव राजा २४, चिखली १४१, मेहकर ११७, मलकापूर ५३, नांदुरा ८५, लोणार ६६, मोताळा १०३, जळगाव जामोद ७२, सिंदखेड राजा ५९ या प्रमाणे संदिग्ध कोरोना बाधित आढळून आले. उपचारादरम्यान चिखली तालुक्यातील काठोडा येथील ५८ वर्षीय व्यक्ती, शेलगाव देशमुख येथील ५८ वर्षीय व्यक्ती, चिखलीमधील ६० वर्षीय महिला, खामगावातील विवेकानंद नगरमधील ८९ वर्षीय पुरुष, नांदुरा तालुक्यातील निमगाव येथील ६० वर्षीय महिला, शेकापूर येथील ५८ वर्षीय व्यक्ती, मलकापूर तालुक्यातील कुंड खुर्द येथील ४५ वर्षीय महिला, जालना जिल्ह्यातील वालसावंगी येथील ५५ वर्षीय पुरुष, जळगाव खान्देश जिल्ह्यातील ७० वर्षीय पुरुष, मलकापूर येथील ४३ वर्षीय पुरुष आणि चिखली तालुक्यातील चंदनपूर येथील ५१ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
दुसरीकडे १०९६ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. सोबतच ३ लाख ७९ हजार १०३ संदिग्धांचे अहवाल आजपर्यंत निगेटिव्ह आले आहेत, तसेच आजपर्यंत ६४ हजार ३३ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
--७,५३३ जणांच्या अहवालाची प्रतीक्षा--
तपासणीसाठी घेण्यात आलेल्या ७,५३३ जणांच्या अहवालाची अद्याप प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ६९,९४७ झाली आहे. त्यापैकी ५ हजार ४५४ सक्रिय रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. आजपर्यंत जिल्ह्यातील ४६० व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.