कोरोना : जिल्ह्यात २९ जण पॉझिटिव्ह, ५० जणांची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:18 AM2020-12-28T04:18:14+5:302020-12-28T04:18:14+5:30
यामध्ये खामगाव पाच, देऊळगाव राजा तीन, चिखली पाच, ब्रह्मपुरी एक, अंचरवाडी एक, उंद्री एक, दाताळा एक, बुलाडणा पाच, खातखेड ...
यामध्ये खामगाव पाच, देऊळगाव राजा तीन, चिखली पाच, ब्रह्मपुरी एक, अंचरवाडी एक, उंद्री एक, दाताळा एक, बुलाडणा पाच, खातखेड एक, विटाळी एक, मेहकर एक, पारखेड एक, गारडगाव एक, शेगाव दोन, सिंदखेड राजातील एकाचा यात समावेश आहे.
दरम्यान, ५० जणांनी रविवारी कोरोनावर मात केली. यामध्ये बुलडाणा दहा, देऊळगाव राजा २०, कामगाव दोन, चिखली ११, नांदुरा दोन आणि जळगाव जामोद कोविड सेंटरमधील पाच जणांचा समावेश असून, त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात तपासण्यात आलेल्या अहवालांपैकी ८७ हजार १७८ संदिग्धांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सोबतच ११ हजार ९४० रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सध्या जिल्ह्यात तपासणी करण्यात आलेल्या रुग्णांपैकी १,३०३ संदिग्धांचे अहवाल प्राप्त होणे बाकी आहे, तर एकूण कोरोनाबाधितांची संख्या १२ हजार ३८२ झाली आहे. त्यापैकी २९३ सक्रिय रुग्ण आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १४९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झालेला आहे.