लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात तपासणीमध्ये रविवारी ५९ जण कोरोना बाधित आढळून आले. दरम्यान ९६ जणांनी कोरोनावर मात केली. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी एकूण २ हजार ७१४ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी २ हजार ६५५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.पॉझिटिव्ह आलेल्या अहवालांमध्ये बुलडाणा तालुक्यातील चार, खामगाव दोन, देऊळगाव राजा दोन, चिखली तेरा, मलकापूर एक, नांदुरा दोन, लोणार एकतीस, जळगाव जामोद तालुक्यातील चार जणांचा समावेश आहे. दरम्यान शेगाव, मेहकर, मोताळा, सिंदखेड राजा आणि संग्रामपूर तालुक्यातील तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी एकही जण कोरोना बाधित आढळून आला नाही. दुसरीकडे ९६ जणांनी रविवारी कोरोनावर मात केली. आतापर्यंत तपासणी करण्यात आलेल्या ५ लाख ८४ हजार २७० संदिग्धांचे अहवाल निगेटिव्ह आले असून कोरोना बाधितांपैकी ८६ हजार १३० जणांनी आजपर्यंत कोरोनावर मात केली आहे.
Corona Cases in Buldhana : ५९ पॉझिटिव्ह, ९६ जणांची काेराेनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2021 11:27 AM