Corona Cases in Buldhana : एकाचा मृत्यू, २३ जण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 11:34 AM2021-07-07T11:34:24+5:302021-07-07T11:34:31+5:30

Corona Cases in Buldhana: तपासणीमध्ये २३ जण कोरोना बाधित आढळून आले तर १३ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

Corona Cases in Buldhana: Death of one, 23 positive | Corona Cases in Buldhana : एकाचा मृत्यू, २३ जण पॉझिटिव्ह

Corona Cases in Buldhana : एकाचा मृत्यू, २३ जण पॉझिटिव्ह

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यात मंगळवारी करण्यात आलेल्या संदिग्धांच्या तपासणीमध्ये २३ जण कोरोना बाधित आढळून आले तर १३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान बुलडाणा शहरातील एकाचा रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे जिल्हयात आतापर्यंत 
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी एकूण २ हजार ५९४ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी २ हजार ५७१ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील सहा व रॅपीड टेस्टमधील १७ अहवालांचा समावेश आहे.
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये खामगाव तालुक्यातील एक, शेगाव एक, देऊळगाव राजा एक, चिखली १५, मलकापूर एक, लोणार एक, जळगाव जामोद तीन या प्रमाणे कोरोना बाधितांचा समावेश आहे. दरम्यान बुलडाणा, मेहकर, नांदुरा, मोताळा, सिंदखेड राजा, संग्रामपूर तालुक्यात करण्यात आलेल्या संदिग्धांच्या तपासणीमध्ये एकही जण बाधित आढळून आला नाही. दुसरीकडे उपचारादरम्यान बुलडाणा शहरातील बजरंगनगरमधील ६० वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दुसरीकडे १३ जणांनी मंगळवारी कोरोनावर मात केली. 
आजपर्यंत तपासणी करण्यात आलेल्या ५ लाख ८८ हजार ४६ संदिग्धांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत तर ८६ हजार १६४ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे.
 

Web Title: Corona Cases in Buldhana: Death of one, 23 positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.