जळगाव जामोद: खामगाव येथील कोविड रुग्णालयात उपचारार्थ भरती असलेल्या कोरोना संदिग्ध ज्येष्ठ नागरिकाचा १६ मेरोजी पहाटे मृत्यू झाला. त्याच्यावर शनिवारी दुपारी अधिकाºयांच्या उपस्थितीत वैद्यकीय प्रोटोकॉल नुसार नगरातील दफनभूमीत त्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. सुलतानपुरा भागात राहणारा व्यक्ती गुरुवारी पुण्यावरून जळगावात दाखल झाल्यानंतर त्याची प्रकृती अस्वस्थ असल्याने शुक्रवारी त्याला खामगाव येथे रुग्णालयात दाखल केले असता शनिवारी पहाटे दोन वाजता त्याचा मृत्यू झाला. त्याच्या स्वब नमुन्याची प्रतीक्षा असून कोरोना संदिग्ध या व्यक्तीवर शनिवारी दुपारी दोन वाजता जळगाव येथे वैद्यकीय प्रोटोकॉलनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत व्यक्तीचे वय ७२ वषार्चे असून त्याला आजाराची पार्श्वभूमी असल्याचे समजते.
सदर व्यक्ती गुरुवारी पुण्यावरून जळगावात दाखल झाली होती. शुक्रवारी त्या व्यक्तीला अस्वस्थ वाटल्याने प्रथम जळगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांनी त्याला खामगाव येथे रेफर केले. शनिवारी पहाटे दोन वाजता त्या व्यक्तीचा खामगाव येथील सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला. त्याचा स्वब घेण्यात आला असून स्वब नमुन्याची प्रतीक्षा आहे. दरम्यान शनिवारी दुपारी २ ते ३ यावेळेत वैद्यकीय प्रोटोकॉल नुसार नगरातील दफनभूमीत त्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुलतानपुरा भागातील एका ७२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याच्यावर वैद्यकीय प्रोटोकॉल नुसार शनिवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. स्वब नमुन्याच्या अहवालानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल.- सुनील जाधव, पोलिस निरीक्षक
जळगाव जामोद गुरुवारी पुण्यावरून नगरात हा व्यक्ती दाखल झाला होता. तेथे शनिवारी पहाटे दोन वाजता या ७२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याच्या अंत्यसंस्काराचा विधी वैद्यकीय प्रोटोकॉलनुसार करण्यात आला आहे. - डॉ. आशिष बोबडे, मुख्याधिकारी जळगाव जामोद