काँग्रसचे बुलडाण्यातील माजी आमदार कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 01:03 PM2020-08-08T13:03:51+5:302020-08-08T13:04:04+5:30
१४ दिवसांसाठी होम क्वारंटीन होत असल्याची माहिती या माजी आमदारांनीच ‘लोकमत’शी बोलताना दिली.
बुलडाणा: काँग्रसचे बुलडाण्यातील माजी आमदार आठ आॅगस्ट रोजी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. दरम्यान, मुंबईमध्ये त्यांच्यासोबत एका नेत्याच्या घरी थांबलेले बुलडाण्यातील दुसरे माजी आमदार, त्यांच्या वाहनाचा चालक आणि पीए हे तिघेही कोरोनाची टेस्ट करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
दरम्यान, यामुळे मुंबईत या माजी अमदारांसोबत असलेल्या आणखी काही जणांना आता प्रसंगी होम क्वारंटीन व्हावे लागण्याची शक्यता आहे. याबाबत अद्याप अधिकृतस्तरावर संबंधितांशी बोलणे झाले नसल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. बुलडाण्यातील माजी आमदार हे मुंबईवरून परतल्यानंतर त्यांना सात आॅगस्ट रोजी कणकण जाणवत होती. त्यामुळे आठ आॅगस्ट रोजी मोताळ््यात होणाºया एका कार्यक्रमात जाण्याअगोदर कुठलीही शंका नसावी म्हणून त्यांनी कोरोनाची रॅपीड टेस्ट केली. त्यात ते पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांचे जवळचे सहकारी व जुने मित्र असलेले माजी आमदार यांनाही त्यांनी याबाबत कल्पना देत समाजमाध्यमावरही आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे त्यांनी जाहीर करून टाकले. त्यामुळे आता पुढील १४ दिवसांसाठी ते होम क्वारंटीन झाले आहेत. दरम्यान त्यांचे सहकारी असलेले दुसरे माजी आमदार हेही त्यांची कोरोना टेस्ट करत असून आगामी १४ दिवसांसाठी होम क्वारंटीन होत असल्याची माहिती या माजी आमदारांनीच ‘लोकमत’शी बोलताना दिली.
दुसरीकडे पाच आॅगस्ट रोजी मुंबईत सुरू असलेल्या जोरदार पावसादरम्यान मुंबईतील एका नेत्याच्या घरी थांबलेल्या या राजकीय व्यक्तींचा एक फोटो समाजमाध्यमावर आलेला आहे. त्यातील अन्य नेत्यांनाही आता प्रसंगी क्वारंटीन व्हावे लागण्याची शक्यता आहे. बुलडाण्यालगतच असलेल्या एका जिल्ह्यातील एका विद्यमान आमदारासह ही मंडळी पाच आॅगस्ट रोजी मुंबईतील एका नेत्याच्या घरी पावसादरम्यान काही काळ थांबली होती.