कोरोना : जिल्ह्यात चौघांचा मृत्यू; ९१६ जण पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:32 AM2021-04-14T04:32:16+5:302021-04-14T04:32:16+5:30
मंगळवारी पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा शहरातील ७५, रायपूर ३, पोखरी ३, पाडळी ४, उमाळा ४, सावळी ४, म्हसला ३, करडी ...
मंगळवारी पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा शहरातील ७५, रायपूर ३, पोखरी ३, पाडळी ४, उमाळा ४, सावळी ४, म्हसला ३, करडी ५, धाड ५, मोताळा १२, पिं. देवी ४, दाभाडी ११, पिं. गवळी ३, उबाळखेड ३, खामगाव ४९, राहुड ३, शेगाव ३९, लासुरा ३, खेर्डा ७, चिखली ४०, वाघापूर ४, शेलगाव आटोळ १२, अंत्री खेडेकर ४, चांधई ३, मलकापूर २, काळेगाव ५, निंबारी ५, उमाळी ६, दे. राजा २७, दे. मही ३, खैरव ४, टाकरखेड भा. ४, सिं. राजा १७, दुसरबीड ३, बाळसमुद्र ३, वखारी ३, मेहकर ५१, हिवरा आश्रम ३, डोणगाव ६, लोणी गवळी ३, दे. माळी २४, जानेफळ ६, वरवट बकाल ६, जळगांव जामोद ११, वडगाव ३, वडगाव पाटण ५, आसलगाव ४, भेंडवळ बु. ३, पिं. काळे ५, नांदुरा २८, आलमपूर ३, पोटा ७८, टाकरखेड ८, तरवाडी ३, वडनेर ३, लोणार १४, बिबी १२, गायखेड ५, दे. कोळ ५, अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील १, वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथील १, अैारंगाबाद येथील १, जालना जिल्ह्यातील विझोरा येथील २, नागपूर येथील २ जणांचा यात समावेश आहे.
दरम्यान, सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा येतील ५५ वर्षीय व्यक्ती, बुलडाण्यातील रामनगरमधील ४८ वर्षीय व्यक्ती, शेगावातील श्रीरामनगरमधील ८९ वर्षीय व्यक्ती आणि मोताळा तालुक्यातील आव्हा येथील ७१ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे ३१३ जणांचा मृत्यू झाला आहे.
- बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक -
मंगळवारी जिल्ह्यात ९१६ जण कोरोना बाधित निघाले असले तरी ९८१ जण कोरोनामुक्त झाले. गेल्या काही दिवसातील रुग्ण बरे होण्याची ही संख्या सर्वाधिक आहे. दरम्यान, आतापर्यंत जिल्ह्यात ४१ हजार ७७६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, मंगळवारी ५५१९ जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या आता ४७ हजार ४४६ झाली असून, त्यापैकी ५३५७ सक्रिय रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.