कोरोनामुळे सहा जणांचा मृत्यू, ७९० जण पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:34 AM2021-04-21T04:34:40+5:302021-04-21T04:34:40+5:30
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या अहवालांपैक ७०२६ जणांचे अहवाल २० एप्रिल रोजी प्राप्त झाले. त्यापैकी ६, २३६ जणांचे अहवाल निगेटिव्ह ...
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या अहवालांपैक ७०२६ जणांचे अहवाल २० एप्रिल रोजी प्राप्त झाले. त्यापैकी ६, २३६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. दरम्यान ७९० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये बुलडाणा तालुक्यातील २०२, खामगाव तालुक्यातील ५०, शेगाव तालुक्यातील ६२, देऊळगावराजा तालुक्यातील २०, चिखली तालुक्यातील ५४, मेहकर तालुक्यातील ५७, मलकापूर तालुक्यातील ३३, नांदुरा तालुक्यातील ४९, लोणार तालुक्यातील ५३, मोताळा तालुक्यातील १२७, जळगाव जामोद तालुक्यातील ४७, सिंदखेडराजा तालुक्यातील ३१ आणि संग्रामपूर तालुक्यातील ५ बाधितांचा समावेश आहे.
दरम्यान, कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या सहा जणांमध्ये मेहकर तालुक्यातील वरवंड येथील ८६ वर्षीय पुरुष, साखरखेर्डा येथील ४५ वर्षीय महिला, बुलडाणा तालुक्यातील गुम्मी येथील ४४ वर्षीय पुरुष, मलकापूरमधील बारदरी येथील ७५ वर्षीय महिला, खामगाव तालुक्यातील गोंधनापूर येथील ४५ वर्षीय पुरुष, मोताळा तालुक्यातील चिंचपूर येथील ६९ वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३४१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
दुसरीकडे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता ५३ हजार ९६३ झाली असून यापैकी ७००८ जण सक्रीय रुग्ण असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. ४६ हजार ६१४ जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. अद्यापही ६ हजार २४८ जणांच्या अहवालाची प्रतीक्षा असून मंगळवारी ३३७ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ३ लाख ६१ हजार ६४ जणांच्या अहवालाची तपासणी करण्यात आली असून कोरोनामुळे जिल्ह्यात ३४१ जणांचा मृत्यू झाला आहे.