पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा तालुक्यातील २८७, खामगावातील ९९, शेगावमधील ५१, देऊळगाव राजातील १५१, चिखली तालुक्यातील १०६, मेहकर तालुक्यातील १६९, मलकापूर तालुक्यातील ७०, नांदुऱ्यातील ८०, लोणारातील १०२, मोताळ्यातील ६४, जळगाव जामोद ५४, सि. राजा ९१ आणि संग्रामपूर तालुक्यातील तीन जणांचा समावेश आहे. दुसरीकडे कोरोनामुळे बुलडाणा शहरातील श्यामनगरमधील ५० वर्षीय व्यक्ती शेगावातील गायत्रीनगरमधील ७१ वर्षीय व्यक्ती, चिखली तालुक्यातील अन्वी येथील ७१ वर्षीय व्यक्ती, चिखली येथील ८० वर्षीय महिला, पिंपळगाव सराई येथील ७२ वर्षीय महिला व ७५ वर्षीय पुरुष, बुलडाण्यातील मलकापूर रोडवरील ७७ वर्षीय व्यक्ती, सिंदखेड राजा तालुक्यातील वाकद जहांगीर येथील ५५ वर्षीय महिला, चिखली तालुक्यातील किन्होळा येथील ७० वर्षीय महिला आणि नांदुरा येथील ४५ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
दरम्यान मंगळवारी ६५५ जणांनी कोरोनावर मात केली. आजपर्यंत तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी ३ लाख ४३ हजार ६४२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सोबतच आजपर्यंत ५३ हजार ६७० जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
--३,६१३ अहवालांची प्रतीक्षा--
मंगळवारी ३, ६१३ संदिग्धांची तपासणी करण्यात आली असून त्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची आता ६१ हजार ३८९ झाली आहे. सध्या ७ हजार ३२९ सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. आजपर्यंत जिल्ह्यात ३९० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.