जिल्ह्यात ९० टक्के शिक्षकांचे कोरोना प्रतिबंध लसीकरण पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:23 AM2021-07-20T04:23:52+5:302021-07-20T04:23:52+5:30
आमच्या शाळेतील सर्वांचे लसीकरण झाले शाळा सुरू झाल्या, याचे समाधान झाले. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून शिक्षकांनी लसीकरण व कोरोना टेस्टिंग ...
आमच्या शाळेतील सर्वांचे लसीकरण झाले
शाळा सुरू झाल्या, याचे समाधान झाले. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून शिक्षकांनी लसीकरण व कोरोना टेस्टिंग करणे आवश्यक आहे. त्या पार्श्वभूमीवर आमच्या शाळेतील सर्व शिक्षकांचे कोरोना लसीकरण झाले आणि आरटीपीसीआर टेस्टसुद्धा करण्यात आलेल्या आहेत.
सुरेश हिवरकर, मुख्याध्यापक, श्री. दे. भ. बाबूराव पाटील विद्यालय लोणी गवळी.
शाळा उघडल्या असून, शिक्षक व विद्यार्थी शाळेत जात आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून शिक्षकांनी कोरोना चाचणी व लसीकरण करून घेणे महत्त्वाचे आहे. ज्या शिक्षकांनी चाचणी व लसीकरण केले नसेल, त्यांनी प्राधान्याने करून घ्यावे.
-प्रकाश मुकूंद, माध्यमिक शिक्षणाधिकारी,
पहिल्याच दिवशी ३ हजार ९४० विद्यार्थ्यांचे एक साथ नमस्ते...
शाळेच्या पहिल्याच दिवशी आठवी ते बारावीतील विद्यार्थ्यांनी शाळा प्रवेशाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी शाळा, महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन व फुलांची उधळण करून शिक्षकांनी स्वागत केले. शाळा सुरू झाल्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी उत्साहात दिसत होते. पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील ३ हजार ९४० विद्यार्थ्यांनी एक साथ नमस्ते गुरुजी केले.
पहिल्या दिवशी १९५ शाळा सुरू
शासनाने कोरोनामुक्त गावांमध्ये इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा, महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार, बुलडाणा जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये १५ जुलै रोजी पहिल्याच दिवशी १९५ शाळा सुरू झाल्या आहेत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ३३ अशा एकूण २२८ शाळा सुरू झाल्या आहेत.
जिल्ह्यातील एकूण शिक्षक १७९३३
आठवी ते बारावी शाळांची संख्या ६६१