तीच परिस्थिती आज पािहली असता ८२ दिवसात १ लाख १७ हजार ३४३ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या असून त्यातील १९,००६ जण बाधित निघाले आहेत. तर ८९ जणांचा मृत्यू झाला आहे. १३,२२८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी झाले असून ते ७० टक्क्यांवर आले आहे. मुळात कोरोनाच्या चाचण्या वाढल्यामुळे हा बदल झाला आहे. परिणाम स्वरूप आरोग्य विभागात पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्याचे एकंदरीत चित्र सध्या आहे.
--८२ दिवसात ८९ जणांचे मृत्यू--
नववर्षात कोरोनामुळे ८२ दिवसात ८९ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या एक वर्षाचा विचार करता २४० मृत्यूपैकी ८९ जणांचे मृत्यू तीन महिन्यात झाले आहे. जिल्ह्यात झालेल्या एकूण मृत्यूपैकी ३७ टक्के मृत्यू हे २०२१ मध्ये झाले आहेत. एकंदरीत ही संख्या अधिक वाटत असली तरी प्रत्यक्षात जिल्ह्याचा मृत्यूदर घटला असून गत तीन महिन्याचा हा मृत्यूदर अवघा ०.४६ टक्के आहे. एकंदरीत कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा दर जिल्ह्यात नियंत्रणात येण्यास यामुळे मदत झाली असल्याचे स्पष्ट होत आहे.
--अशी आहे वर्षातील स्थिती---
वर्ष मृत्यू बाधित बरे झालेले
मार्च २०२० ०१ ०० ००
एप्रिल २०२० ०० २४ १७
मे २०२० ०३ ५५ ३२
जून २०२० ११ २३० १४७
जुलै २०२० २९ १२०९ ७४४
ऑगस्ट २०२० ४८ ३०७१ २१२४
सप्टेंबर २०२० ८८ ६९९७ ५८२०
ऑक्टोबर २०२० १२५ ९३६९ ८६१०
नोव्हेंबर २०२० १३४ ११२०६ १०६९४
डिसेंबर २०२० १५१ १२४६८ १२१०९
जानेवारी २०२१ १६९ १३९२८ १३४०५
फेब्रुवारी २०२१ १९२ १८३२८ १५४९२
मार्च २०२१ २४० ३१४७४ २५३३७