उमेद अभियानातील महिला बनल्या कोरोना वॉरियर्स;  बनविले ५ हजार मास्क!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2020 03:40 PM2020-04-06T15:40:16+5:302020-04-06T15:40:31+5:30

उमेद अभियानाअंतर्गत स्थापन झालेल्या १५ महिला बचत गटातील एकूण १२० महिला शिवण काम करीत आहेत.

Corona Warriors Become Women in Hope Campaign; Made 5 thousand masks! | उमेद अभियानातील महिला बनल्या कोरोना वॉरियर्स;  बनविले ५ हजार मास्क!

उमेद अभियानातील महिला बनल्या कोरोना वॉरियर्स;  बनविले ५ हजार मास्क!

Next

- जयदेव वानखडे
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव जामोद: महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती जळगावच्या वतीने कोरोना विषाणुचा प्रसार रोखण्यासाठी तालुक्यातील बचत गटाच्या महिलांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे.
गटविकास अधिकारी शिवशंकर भारसाकडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उज्वला पाटील , विस्तार अधिकारी संदीप मोरे यांनी त्यांच्या यंत्रणेमार्फत उपाय योजना केल्या. तालुका अभियान कक्ष व कार्यरत अधिकारी आर.सी.शेख यांच्या स्वयंसहायता समुहातील बचत गटाच्या महिलांनी याकरिता योगदान दिले. जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रकल्प संचालक यांच्या मार्गदर्शनात समूहातील महिलांकडून मास्क तयार करण्यात आले.
गाव पातळीवर कोरोना रोखण्यासाठी मोठया प्रमाणात प्रयत्न करण्यात येत असून, विविध गावात बचत गटाच्या महिलांनी मास्क तयार करून सामाजिक बांधिलकी जोपासली. 500 मास्क विनामूल्य ग्रामपंचायतींना दिले. गावातील लोकांनी मास्क वापरावा हा संदेश यातून देण्यात आला.
या कामाकरिता तालुक्यातील एकूण १२० महिला शिवण काम करतात. त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र, नगरपरिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत कडून मास्क तयार करण्यासाठी आॅर्डर देण्यात आली. उमेद अभियानाअंतर्गत स्थापन झालेल्या १५ महिला बचत गटातील एकूण १२० महिला शिवण काम करीत आहेत. मास्कसाठी आवश्यक असणारा कापड तहसीलदारांच्या मार्गदर्शनात उपलब्ध करून देण्यात आला. मास्कची संख्या पाहता कापड कमी पडत असल्याने खामगाव येथून कापड उप्लधब करून देण्यासाठी शेख यांनी प्रयत्न केले.
मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्हास्तरावरू कोरोनाविरोधात लढणाऱ्या कर्मचाऱ्यांना गाऊन तयार करून देण्याचे कामही बचत गटांच्या महिलांकडून करून घेण्यात येणार आहे.
नगरपरिषद जळगाव, तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ४७ ग्रामपंचायत, विविध मेडिकल स्टोअर्स यांच्या मागणीनुसार मास्कचा पुरवठा बचत गटाच्या महिलांकडून करण्यात येत आहे. महिला स्वयंसहायता समूहामार्फत मास्क निर्मितीचे काम सुरू असून सर्व विभागांना उर्वरित मास्कचा पुरवठा करण्यात येणार आहे. मास्क निर्मितीसाठी तालुका समन्वयक विनोद शेगोकार, प्रभाग समन्वयक राजगोविंद मडावी, दलाल, हर्षा बोडके जामोद, अनुराधा कोथळकर, मीना कापरे सुनगाव, शोभा हिवरकार धानोरा, शालिनी वानखडे, जयश्री वानखडे वडशिंगी, राधा खापट पिंपळगाव काळे, शीला गायकी पळशी सुपो यांच्यासह महिला प्रयत्न करीत आहेत.

 
महिलांना मिळाला रोजगार!

सध्या लॉकडाऊनच्या काळात एकीकडे मजुरांना मजुरी नाही तर दुसरीकडे मास्क तयार करण्याच्या या उपक्रमातून बचत गटाच्या महिलांना रोजगारही उपलब्ध झाला आहे. यातून कोरोना विरोधात लढणाºयांना मास्क उपलब्ध होत असून दुसरीकडे महिलांना रोजगारही उपलब्ध झाला आहे.

Web Title: Corona Warriors Become Women in Hope Campaign; Made 5 thousand masks!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.