बुलडाणा: मलकापूर येथे आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला असून या रुग्णाचा २४ जून रोजी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर लोणार तालुक्यातील सुलतानपूर येथे एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या १७१ वर पोहोचली आहे तर पैकी ११ जणांचा मृत्यू झालेला आहे.अकोला येथील प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या अहवालांपैकी २८ अहवाल गुरूवारी प्राप्त झाले. यापैकी २७ अहवाल हे निगेटिव्ह आले तर एक अहवाल पॉझिटिव्ह आला. पॉझिटिव्ह अहवाल हा मलकापूर येथील मंगलगेट परिसरातील ६७ वर्षीय महिलेचा असून ही महिला २४ जून रोजीच मृत्यू पावली होती. दरम्यान, या मृत महिलेच्या पार्थिवावर वैद्यकीय प्रोटोकॉल नुसार अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.दुसरीकडे आतापर्यंत जिल्ह्यात तपासणी करण्यात आलेल्या दोन हजार ३५३ व्यक्तींचे अहवाल हे निगेटीव्ह आले आहेत. त्याच प्रमाणे कोरोना बाधीतांपैकी उपचारानंतर बरे झालेल्यांची संख्या ही १३५ वर पोहोचली आहे.जिल्यात आज अखेरीस १७० रुग्ण पॉझिटिव्ह असून त्यापैकी १३५ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या जिल्ह् यात प्रत्यक्षात २५ अॅक्टीव्ह रुग्णांवर उपचार करण्यात येत असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. रामेस्वर पुरी यांनी दिली.दुसरीकडे गेल्या २५ दिवसात जिल्ह्यात आठ कोरोना बाधीतांचा मृत्यू झाल्यामुळे नागरिकांमध्ये काहीसी घबराट आहे. जिल्ह्यातील एकूण बाधीत रुग्णांच्या टक्केवारीशी त्याची तुलना करता जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णांचे मृत्यू होण्याचे प्रमाण हे सध्या सहा टक्क्यावर पोहोचले आहे. गेल्या नऊ दिवसात सात व्यक्तींचा मृत्यू झाला असून हे सर्व मलकापूर तालुक्यातील आहे.
११ जणांचा मृत्यूबुलडाणा जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना संसर्गाने ११ व्यक्तींचा मृत्यू झाला असून जून महिन्यात गेल्या २५ दिवसांमध्ये ७ रुग्ण दगावले आहेत. यात मलकापूर शहरातील सहा जणांचा समावेश आहे. मलकापूर शहर हे कारोना संर्गाच्या दृष्टीने सध्या हॉटस्पॉट बनलेले आहे. मधल्या काळात येथे मोठ्या संख्येने कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडत होते. मात्र गेल्या तीन ते चार दिवसासून हे प्रमाण कमी झाल्याचे चित्र आहे.७९ टक्के रुग्ण झाले कोरोना मुक्तजिल्ह्यात कारोनामुक्त झालेल्या रुग्णांची टक्केवारी ही ७९ वर पोहोचली आहे. जिल्ह्याच्या दृष्टीने ही दिलासा देणारी बाब म्हणावी लागले. मात्र अलिकडील काळात मृत्यू वाढल्यामुळे समस्या आहे.