लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरोना संसर्गाची व्याप्ती जिल्ह्यात वाढत असून मंगळवारी ५२ कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले. सध्या एकूण कोरोना बाधितांची संख्या १,५३९ झाली आहे.पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये बुलडाणा येथे चार, मोताळा येथे तीन, खामगावमध्ये १४ देऊळगाव राजा येथे सात, बोराखेडी बावरा येथे ११, मोताळा तालुक्यातील खरबडी येथे दोन, साखरखेर्डा येथे सात, गोतमारा येथे तीन, नांदुरा येथील एका जणाचा यामध्ये समावेश आहे.मंगळवारी ५३ जणांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे रुग्णालयातून त्याां सुटी देण्यात आली आहे. यामध्ये बुलडाणा येथील एक, देऊळगाव राजा येथील सहा, अमडापूर एक, दाताळा येथील एक, जळगांव जामोद येथील तीन, नांदुऱ्यातील १४, चांदुरबिस्वा येथील नऊ, धानोरा खुर्द येथील एक, अंचरवाडी येथील एक, खामगावमधील ११, माटरगाव येथील एक या प्रमाणे ५३ जणांची रुग्णालयातून सुटी झाली आहे.दरम्यान, कोरोना संदिग्ध रुग्णांपैकी आपातर्यंत १०, २६२ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. सोबतच बाधीत व्यक्तींपैकी ९४० व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे या ९४० जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.वर्तमान स्थितीत १२३ संदिग्ध रुग्णांचे अहवाल प्रतीक्षेत आहे. वर्तमान स्थितीत जिल्ह्यात एकूण १,५३९ कोरोना बाधीत रुग्ण आहे तर बरे झालेले रुग्ण वगळता प्रत्यक्षात ५६९ कोरोना बाधीतांवर उपचार करण्यात येत आहे. जिल्ह्यात कारोनामुळे मृत्यू झाले्लया रुग्णांची संख्या सध्या ३० असल्याची माहिती बुलडाण्याचे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. रामेश्वर पुरी यांनी दिली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींची संख्या जिल्ह्यात ३० झाली असून बुलडाणा जिल्ह्याचा मृत्यूदर हा १.९४ टक्क्यांवर आला आहे. यापूर्वी सव्वा दोन टक्के ऐवढा हा दर होता. दरम्यान, जिल्ह्यात मात्र कोरोना बाधितांची संख्या सातत्याने वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.
CoronaVirus in Buldhana : आणखी ५५ पॉझिटिव्ह; ५३ जण कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2020 8:11 PM