CoronaVirus in Buldhana : आरोग्य उपसंचालकांनी केली ‘हाय रिस्क झोन’ची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 06:13 PM2020-03-31T18:13:07+5:302020-03-31T18:14:09+5:30
आरोग्य उपसंचालक आर. एस. फारुकी यांनी ३१ मार्च रोजी बुलडाणा शहरास भेट देवून हाय रिस्क झोनची पाहणी केली.
बुलडाणा: रविवारी बुलडाण्यातून पाठविण्यात आलेल्या ३२ स्वॅब नमुन्यांपैकी मृत व्यक्तीच्या संपकार्तील दोन जणांच्या नमुन्याचा अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, अत्यापही नऊ जणांचे अहवाल येणे बाकी आहे. दुसरीकडे आरोग्य उपसंचालक आर. एस. फारुकी यांनी ३१ मार्च रोजी बुलडाणा शहरास भेट देवून हाय रिस्क झोनची पाहणी केली.
दोन दिवसापूर्वी बुलडाणा शहरातील एका ४७ वर्षीय मृत व्यक्तीचे स्वॅब नमुन्याचा अहवाल पॉझीटीव्ह आले होते. त्यानंतर बुलडाणा शहरातील संपूर्ण यंत्रणा हादरली होती. तर संपूर्ण शहर सील करण्यात आले होते. मृत व्यक्तीच्या जवळच्या संपकार्तील ६६ जणांना हॉस्पीटल कॉरंटीन करण्यात आले होते तर काहींना आयसोलेशन कक्षात ठेवण्यात आले होते. सोबच ३२ जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी नागपूर येथे पाठविण्यात आले होते. त्यातील २१ जणांचे नमुने हे निगेटीव्ह आले होते. दरम्यान ३१ मार्च रोजी पहाटे मृत व्यक्तीच्या संपकार्तील निकटवर्तीय असलेल्या एका अल्पवयीन मुलीचे आणि एका वयोवृद्धाच्या स्वॅबचे नमुने पॉझीटीव्ह आले होते. त्यांना सध्या आयसोलेशन कक्षात ठेवण्यात आले आहे. दुसरीकडे ज्या व्यक्तींचे नमुने हे निगेटीव्ह आले आहेत त्यांना आरोग्य उपसंचालक डॉ. आर. एस. फारूकी यांनी पाहणी केल्यानंतर होम क्वारंटीनमध्ये ठेवण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. ज्या नऊ जणांचे नमुन्याचे अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाहीत त्यांच्यावर सध्या वॉच ठेवण्यात आला आहे. त्यांच्यात जर कोरोना संसगार्ची लक्षणे आढळल्यास आयसोलेशन कक्षात हलविण्यात येईल, असेही डॉ. फारूकी यांनी स्पष्ट केले. स्वत: आरोग्य उपसंचालक डॉ. फारूखी यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय, आयसोलेशन कक्ष आणि स्त्री रुग्णालयाचीही जिल्हा शल्यचिकित्सकांसमवेत जवळपास दोन तास पाहणी केली. त्यानंतर बुलडाणा शहरातील हायरिस्क झोनमध्ये जावून त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. दुसरीकडे ३२ पैकी नऊ स्वॅबचे नमुने अद्याप प्राप्त झालेले नाहीत. ते उपलब्ध होण्यास आणखी काही कालावधी लागण्याची शक्यता ही त्यांनी व्यक्त केली आहे. सोबतच हायरिस्क झोनमधील व्यक्तींनी आरोग्य विभागाच्या पथकास आरोग्य तपासणीसाठी सहकार्य करण्याचे आवानही त्यांनी केले. याबाबत स्थानिक नागरिकांशी संवाद झाला असून त्यांचे सहकार्यही त्यास मिळले, असे त्यांनी स्पष्ट केले.
स्त्री रुग्णालयात १०० बेडची सुविधा
बुलडाणा येथे उभारण्यात आलेल्या स्त्री रुग्णालयात १०० बेडची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून संभाव्य आपत्कालीन परिस्थितीसाठी येथे २० व्हेंटीलेटर उपलब्ध करण्यात आले असल्याचे आरोग्य उपसंचालक डॉ. आर. एस. फारूखी यांनी सांगितले. स्त्री रुग्णालयामध्ये सुविधा असल्या तरी येथे सेंट्रल आॅक्सीजन युनीट बाबत अडचण असल्याबाबत विचारणा केली असता येथे आपण आॅक्सीजन सिलींडर उपलब्ध केले आहेत. सोबतच व्हेंटीलेटर कमी पडल्यास आयएमएच्या संपर्कात असून स्थानिक पातळीव त्यांचेही पूर्ण सहकार्य असल्याचे ते म्हणाले. दुसरीकडे हायरिस्क झोनमध्ये आरोग्य विभागाचे अ?ॅक्टीव्ह सव्हीर्लंस सुरू असल्याचेही त्यांनी ह्यलोकमतह्ण शी बोलतांना स्पष्ट केले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सकही त्यांच्या समवेत होते.