लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात कोराना बाधीतांचा आकडा १,६१७ वर पोहोचला असून गेल्या २४ तासात जिल्ह्यात कोरोनामुळे चौघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृत्यूपावलेल्यांचा आकडा हा ३४ झाला आहे. दुसरीकडे बुधवारी जिल्ह्यात ७८ नवे कोरोना बाधीत आढळून आले असून कोरोना मुक्त झालेल्या ३९ जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. दरम्यान, सध्या ६०४ रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.गेल्या २४ तासात बुलडाणा जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांमध्ये बुलडाणा शहरातील तेलगूनगरमधील ७८ वर्षीय व्यक्ती, खामगावमधील शिवाजीनगर भागात राहणारा ४० वर्षीय व्यक्ती, चिखली येथील ७० वर्षाची महिला आणि लोणार येथील ५५ वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये तीन पुरुष तर एका महिलेचा समावेश आहे.दरम्यान, बुधवारी प्रयोग शाळा आणि रॅपीड अॅन्टीजेंट टेस्टमिळून ५०७ जणांचे अहवाल जिल्ह्यास प्राप्त झाले. यापैकी ४२९ जणांचा अहवाल निगेटीव्ह आला तर ७८ जण पॉझिटिव्ह आले. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील ४० व रॅपीड टेस्टमधील ३८ जणांचा समावेश आहे. पॉझिटिव्ह आढळून आलेल्यामध्ये खामगावात २७, जळगाव जामोदमध्ये एक, जळगाव जामोद तालुक्यातीलच वाडी येथील दोन , मलकापूर तालुक्यातील वजीराबादमधील एक, मलकापूर शहरातील सहा, चिखलीमधील २, खामगाव तालुक्यातील रोहणा येथील एक, साखरखेर्डा येथील चार, देऊळगाव राजा तालुक्यातील दिग्रस येथील तीन, देऊळगाव राजा शहरातील सात, बोराखेडी येथील एक, बुलडाणा शहरातील सात, डोंगरशेवली येथील एक, मेहकरमधील एक, लोणारमधील एक, येसापूर येथील एक, संग्रामपूर तालुक्यातील वसाडी येथील एक, शेगावमधील पाच, माटरगाव मधील तीन, घाटबोरी येथील एक, दाताळा येथील एक, डोणगावमधील एक एकाचा समावेश आहे.
CoronaVirus : बुलडाण्यात चौघांचा मृत्यू, ७८ नवे पॉझिटीव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2020 7:09 PM