CoronaVirus : ‘स्वयं मूल्यमापन टेस्ट'ला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2020 10:59 AM2020-04-05T10:59:10+5:302020-04-05T10:59:34+5:30
खामगाव शहरातील सुमारे १४० नागरिकांनी घरबसल्या आरोग्याची खात्री करून घेतली आहे.
- योगेश फरपट
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : महाराष्ट्र शासनातर्फे कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी अत्यावश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. कोरोना विषाणूची लागण झाली आहे की नाही याची खातरजमा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कोव्हिड-१९ 'स्वयं मूल्यमापन टेस्ट' सुरु केली आहे. या टेस्टचा जिल्हयातील अनेक नागरिकांनी लाभ घेतला आहे. यामध्ये खामगाव्२ा शहरातील सुमारे १४० नागरिकांनी घरबसल्या आरोग्याची खात्री करून घेतली आहे.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून अनेक उपाययोजना राबविल्या जात आहेत. त्यापैकी कोव्हिड-१९ कोरोनाची 'स्वयं मूल्यमापन टेस्ट' ही एक आहे. मराठी आणि हिंदी भाषेत देखील ही २ मिनिट्स टेस्ट उपलब्ध आहे. नागरिकांनी वेबसाईटवर जावून आपल्या ही टेस्ट करून घेण्याचे आवाहन मुख्याधिकारी धनंजय बोरीकर यांनी केले आहे.
ही एकप्रकारे डिजीटल चाचणीच: डॉ. निलेश टापरे
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांच्या मार्गदर्शनात अत्यावश्यक त्या उपाययोजना सामान्य रुग्णालयात करण्यात आल्या आहेत. सध्या कम्युनिटी स्प्रेडचा धोका नसल्याचे दिसून येते. मात्र नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. यासाठी शासनाच्या अधिकृत असलेल्या या बेवसाईटला भेट देवून नागरिकांनी डिजिटल चाचणी करून घेणे गरजेचे आहे. कोरोना विषाणूची लक्षणे ओळखण्याची ही एक सोपी पद्धत आहे. प्रत्येकाने यासाठी पुढाकार घ्यावा. जेणेकरून आपल्या मनातील शंका दूर होईल, असे सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश टापरे यांनी सांगितले.
खात्री करा
ज्या नागरिकांना ज्या नागरीकांना सर्दी, खोकला आणि तापेचे लक्षण असतील आणि त्यांची ट्रॅव्हलिंग हिस्ट्री असेल असे नागरिक ँ३३स्र२://ूङ्म५्र1ि9.ेंँं१ं२ँ३१ं.ॅङ्म५.्रल्ल जाऊन आपले निदान करू शकतात. सदर लिकवर टेस्ट संदर्भात तुम्हाला काही प्रश्नांची उत्तर द्यायची आहेत. त्याआधारे आपल्याला कोरोना विषाणू संसर्ग झाला आहे की नाही याची खात्री मिळते. ही वैद्यकीय चाचणी नसली तरी यामाध्यमातून मनातील शंका दूर होते.