CoronaVirus : बुलडाणा जिल्ह्यात ६० हजार नागरिकांचे सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 12:39 PM2020-06-27T12:39:31+5:302020-06-27T12:39:38+5:30

जिल्ह्यात सध्या ५९ प्रतिबंधीत क्षेत्र असून त्यामधील ६० हजार ४९० नागरिकांचे नियमितपणे आरोग्य सर्व्हेक्षण करण्यात येत आहे.

CoronaVirus: Survey of 60,000 citizens in Buldana district | CoronaVirus : बुलडाणा जिल्ह्यात ६० हजार नागरिकांचे सर्वेक्षण

CoronaVirus : बुलडाणा जिल्ह्यात ६० हजार नागरिकांचे सर्वेक्षण

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग सातत्याने वाढत असून खामगाव नांदुऱ्यामध्ये प्रत्येकी चार कोरोना बाधीत आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर माहिती घेतली असता जिल्ह्यात सध्या ५९ प्रतिबंधीत क्षेत्र असून त्यामधील ६० हजार ४९० नागरिकांचे नियमितपणे आरोग्य सर्व्हेक्षण करण्यात येत आहे.
एकंदरीत वर्तमान स्थितीत जिल्ह्यातील दोन टक्के नागरिक हे कोरोना संसर्गीत व्यक्ती सापडलेल्या भागात राहत असून त्यांचे आरोग्य विभागाच्या २५६ पथकांद्वारे नियमति सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. खामगाव शहरात चार कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने प्रतिबंधीत क्षेत्राची संख्या आता आणखी वाढणार आहे. जिल्ह्यात २८ मार्च पासून आजपर्यंत १८३ कोरोना बाधीत आढळून आले असून ते राहत असलले क्षेत्र हे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत. त्यांची एकूण संख्या ७४ वर जाते. दरम्यान, यापैकी १५ प्रतिबंधीत क्षेत्र शिथील करण्यात आले आहे. या १५ क्षेत्रात २८ दिवसात एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून न आल्यामुळे हे पाऊल उचलण्यात आले होते.
मात्र त्याउपरही सध्या ५९ प्रतिबंधीत क्षेत्र सध्या जिल्ह्यात असून १३ पॉझिटिव्ह रुग्ण पुन्हा जिल्ह्यात आढळून आल्याने यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. प्रतिबंधीत क्षेत्रात असलेल्या ११ हजार ९०५ घरांमध्ये ६० हजार ४९० नागरिक राहत असून त्यांच्या आरोग्याची बारकाईने सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. त्यासाठी २५६ पथकांमध्ये खासकरून ७३ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
दुसरीकडे नांदुरा, खामगाव, शेगावातील आळसणा, शेगावातील शादीखाना, बावनबीर या सहा ठिकाणी बाधीत व्यक्तीच्या घरालगतचा भाग प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून बाधीतांच्या संपर्कातील व्यक्तींचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात आले असून त्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत.


६४१ व्यक्तींना दुर्धर आजार
प्रतिबंधीत क्षेत्रातील सर्व्हेक्षणा दरम्यान ६४१ व्यक्तींना दुर्धर आजार असल्याचे स्पष्ट झाले असून त्यांच्यावरही ७३ डॉक्टर नजर ठेवून आहेत. प्रसंगी मलकापूर शहरातील दुर्धर आजार असलेल्यांचा स्वॅबही घेतला जाण्याची शक्यता आहे.

 

Web Title: CoronaVirus: Survey of 60,000 citizens in Buldana district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.