Coronavirus: बुलढाणा जिल्ह्यात आणखी दोन पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 07:52 PM2020-05-16T19:52:43+5:302020-05-16T19:53:00+5:30
Coronavirus: बुलढाणा जिल्ह्यात आणखी दोन पॉझिटिव्ह.
href='https://www.lokmat.com/topics/buldhana/'>बुलडाणा: जिल्ह्यात आणखी दोन जणांचे कोरोना संसर्गाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून एक रुग्ण हा खामगाव तर एक रुग्ण शेगाव येथील आयसोलेशन कक्षात आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या ही आता २८ वर गेली आहे.खामगाव येथील आयसोलेशन कक्षात असलेली महिला ही पॉझिटिव्ह आली असून ती नेमकी कुठली रहिवाशी आहे, हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. दुसरीकडे शेगाव येथील रामदेवबाब नगरमधील एक सफाई कामगार कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. कोरोना संदिग्ध म्हणून त्यास शेगाव येथील आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आले होते. त्याचा स्वॅब पॉझिटिव्ह आला आहे.प्रकरणी आता शेगाव येथील तालुका आरोग्य अधिकारी व त्यांचे पथक सध्या या रुग्णाच्या संपर्कातील हायरिस्क व लो रिस्क कॉन्टॅक्टमधील व्यक्तींचे ट्रेसिंग करत असून हायरिस्क कॉन्टॅक्टमधील व्यक्तींना क्वारंटीन करून रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यात कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या आता २८ झाली आहे. दुसरीकडे बुलडाणा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून कोरोना संसर्गाचा धोका सातत्याने वाढत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.