लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी सहा जणांचा मृत्यू झाल्याची नोंद २० सप्टेंबर रोजी घेण्यात आली. त्यामुळे कोरोनाबळींचा आकडा ६३ वर गेला आहे दुसरीकडे दिवसभरात १५० जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आता कोरोनाबाधितांची संख्या ३५५५ वर पोहोचली आहे. दरम्यान रविवारी ९८ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.सप्टेंबर महिन्यात रुग्णसंख्या वाढीचा वेग वाढला असून, कोरोनामुळे मृतकांचा आकडाही वाढला आहे. रविवारी आणखी सहा जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली. रविवारी दिवसभरात १५० जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. यामध्ये वाशिम शहरातील सुंदरवाटिका २, शिक्षक कॉलनी परिसर १, लाखाळा परिसर ११, शुक्रवार पेठ ६, सुभाष चौक १, बाहेती गल्ली १, स्त्री रुग्णालय परिसर १, सिंधी कॅम्प १, गोंदेश्वर १, माधव नगर २, नंदिपेठ ११, ध्रुव चौक २, जुनी आययुडीपी १, लोनसुने चौक येथील १, काटीवेस ३, सिव्हील लाईन्स ३, चामुंडादेवी परिसर ३, वाटाणे वाडी १, आनंदवाडी १, विनायक नगर १, पाटणी चौक परिसर १, काळे फाईल १, शहरातील इतर ठिकाणचे ३, बाभुळगाव १, सोयता १, उमरा शमशुद्दीन ४, अनसिंग २, केकतउमरा १५, सेनगाव १, जांभरूण जहांगीर येथील १२, तामसी ५, आसोला १, मोहगव्हाण १, मालेगाव शहरात ९, एरंडा १, अमानी २, डव्हा १, पिंप्री सरहद येथील २, झोडगा २, रिसोड शहरात ११, गणेशपूर ४, चिचांबा पेन येथील २, नेतान्सा १, मांगुळ झनक येथील १, हिवरा पेन येथील २, नंधाना येथील १, केनवड येथील १, रिठद येथील १, कारंजा लाड शहरात २, हिवराळा येथील १, मंगरूळपीर शहरातील ३, शिवणी येथील १ अशा १५० जणांचा समावेश आहे. आता कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ३५५५ झाली असून, यापैकी २६१९ जणांनी कोरोनावर मात केली. आता ८७२ अॅक्टिव्ह रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालय, खासगी कोविड हॉस्पिटल, तालुकास्तरीय कोविड केअर सेंटर येथे उपचार सुरू आहेत.
चार महिला, दोन पुरुषांचा मृत्यूजिल्ह्यात कोरोमुळे मृत्यू होणाऱ्यांच्या आकड्यात हळूहळू वाढ होत असल्याने जिल्हावासियांची चिंता वाढली आहे. वाशिम शहरातील चामुंडादेवी परिसरातील ४५ वर्षीय महिला, ब्रह्मा येथील ६९ वर्षीय पुरुष, शिरपुटी येथील ५५ वर्षीय महिला, रिठद (ता. रिसोड) येथील ६५ वर्षीय महिला, सोनखास (ता. मंगरूळपीर), येथील ६७ वर्षीय पुरुष, मालेगाव शहरातील ८५ वर्षीय महिला अशा एकूण सहा जणांच्या मृत्यूची नोंद रविवारी घेण्यात आली. आतापर्यंत एकूण ६३ जणांचे मृत्यू झाले तर एका रुग्णाने आत्महत्या केली.
९८ जणांना डिस्चार्जकोरोनावर मात करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. रविवारी जिल्ह्यातील ९८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत एकूण ३५५५ जण कोरोनाबाधित आढळून आले असून, यापैकी २६१९ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
८७२ जणांवर उपचारजिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. सप्टेंबर महिन्यात रुग्णवाढीचा वेग चांगलाच झेपावला आहे. सध्या जिल्ह्यातील विविध कोविड हॉस्पिटलमध्ये एकूण ८७२ जण उपचार घेत असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.