- ब्रम्हानंद जाधव लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जलसंधारणाच्या कामातून निघणाऱ्या लाखो घनमीटर गौण खनीजाचा वापर महामार्ग बांधकामासाठी करून एक नवा पॅटर्न बुलडाण्यात जन्माला आला. जलसमृद्धीचा हा बुलडाणा पॅटर्न देशात लागू करण्याचे संकेत केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक आणि एसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर येथे दिली. बुलडाण्याच्या जलसमृद्धीची स्वत: गडकरी यांनी दखल घेतल्याने जिल्ह्यातील अधिकारी वर्गही आता जागरूक झाला आहे.देशभरामध्ये महामार्गाची कामे सध्या सुरू आहेत. राज्यातही समृद्धी महामार्ग व राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा असलेले काम सुरू आहेत. महामार्गाच्या कामासाठी महत्त्वाची अडचण येते ती म्हणजे, गौण खनिज आणि पाण्याची. परंतू जलसंधारणाच्या कामातून महामार्गाच्या कामासाठी पाणी आणि गौण खनिज उलब्ध केल्याचा उत्कृष्ट प्रयोग बुलडाण्यामध्ये काही महिन्यापूर्वी समोर आला होता. राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा असलेला अजिंठा-खामगाव हा मार्ग बुलडाणा तालुक्यातून गेलेला आहे. या रस्त्याच्या कामासाठी लागणारे गौण खनीज हे रस्त्याला समांतर गेलेल्या सुमारे २६ किमी लांबीच्या पैनगंगा नदीपात्रातून घेऊन नदी खोलीकरण करून निघणारे गौण खनीज हे रस्ता कामासाठी वापरण्याचा नवा प्रयोग याठिकाणी झाला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची या प्रकल्पासाठी माजी आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी अनुमती मिळवून हा प्रकल्प मार्गी लावला होता. रस्ता बांधकाम करण्यासाठी आवश्यक असलेले गौणखनीज जलस्त्रोत निर्माण होऊ शकणाºया ठिकाणाहून उपसा करण्याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला आदेशित करण्याबाबतच्या प्रस्तावास मान्यता मिळवली होती. त्या अंतर्गत अजिंठा-बुलडाणा या महामार्गासाठी लागणाºया गौणखनीजाची उपलब्धता जलस्त्रोत निर्मितीतून झाली.बुलडाणा तालुक्यातील मढ येथे ५, चौथा १, पाडळी १ अशा सात गाव तलावांच्या निर्मितीमधून महामार्गासाठी गौण खनिज उपलब्ध झाले. यामध्ये शासनाचा कुठलाच खर्च झाला नाही. त्यामुळे जलसंवर्धनासोबतच महामार्गासाठी गौण खनीजाच्या उपलब्धीचा हा प्रकल्प देशासाठी लक्षवेधी ठरत आहे. देशासाठी महत्त्वाचा प्रकल्पबुलडाण्यातील जलसमृद्धीचा पॅटर्न देशासाठी किती महत्त्वाचा आहे, या संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी नागपूर येथील बैठकीत स्पष्ट केले. त्यामुळे बुलडाण्याच्या या पॅटर्नचे खºया अर्थाने महत्त्व देशासमोर येत आहे.
पैनगंगेचे पुनरूज्जीवन अजिंठा पर्वत रांगेच्या कुशीत वसलेल्या पैनगंगा नदीपात्राच्या परिसरातील गावांना दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. परंतू पैनगंगा उगमस्थानापासून ते येळगाव धरण क्षेत्रापर्यंत १०४ सिमेंट नाला बांध काम करण्यात आले. सोबतच नदी खोलीकरणाच्या माध्यमातू पैनंगेचे पुनरूज्जीवन हा प्रोजेक्ट राबवून पाणी पातळीत वाढ आणि महामार्गाला गौण खनिज असा दुहेरी फायदा झाला.