लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : विकास आराखड्यांतर्गत आर.डी.३ चे काम अतिशय संथ गतीने सुरू असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. कंत्राटदाराकडून निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने संतापलेल्या नागरीकांनी भैरव चौकात सुरू असलेले पेव्हर ब्लॉक बसविण्याचे बांधकाम बंद पाडले. यावेळी सा.बां.विभागाचे अभियंता देशमुख यांना पाचारण करण्यात आले असता त्यांनीही बांधकाम निकृष्ट दजार्चे होत असल्याचे सांगून कंत्राटदारास काम थांबविण्यात सांगितले. ही घटना ७ नोव्हेंबर रोजी घडली.स्थानिक भैरव चौक परिसरात आरडी-३ रस्त्यावर अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र या कामात निकृष्ट दजार्चे बांधकाम साहित्य वापरण्यात येत असल्याची खात्री पटल्याने या भागातील नागरीकांनी अभियंता देशमुख यांना कामाच्या ठिकाणी बोलावून कंत्राटदार करीत असलेले काम निकृष्ट होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. अभियंता देशमूख यांनी कंत्राटदारास काम बंद ठेवण्यास सांगितले असून मागील तीन दिवसांपासून येथील काम बंद आहे. निकृष्ट दजार्चे काम होत असल्याने नागरीकांनी संताप व्यक्त केला आहे.
निकृष्ट दर्जाचे काम नागरीकांनी पाडले बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 12:24 AM
शेगाव : विकास आराखड्यांतर्गत आर.डी.३ चे काम अतिशय संथ गतीने सुरू असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. कंत्राटदाराकडून निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने संतापलेल्या नागरीकांनी भैरव चौकात सुरू असलेले पेव्हर ब्लॉक बसविण्याचे बांधकाम बंद पाडले.
ठळक मुद्देबाधकाम विभागाच्या अधिकार्यांचे दुर्लक्षनागरीकांनी बंद पाडले भैरव चौकातील ‘पेव्हर ब्लॉक’चे काम