मारहाणप्रकरणी दाेघांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:33 AM2021-07-29T04:33:32+5:302021-07-29T04:33:32+5:30
मारहाण करून माेबाइल फाेडला मेहकर : बरटाळा येथील दाेघांनी एकास मारहाण करून त्याचा माेबाइल फाेडल्याची घटना २४ जुलै राेजी ...
मारहाण करून माेबाइल फाेडला
मेहकर : बरटाळा येथील दाेघांनी एकास मारहाण करून त्याचा माेबाइल फाेडल्याची घटना २४ जुलै राेजी घडली़ परमेश्वर श्यामराव पांढरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाेलिसांनी विष्णू विठोबा सावंत, तुकाराम विठोबा सावंत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़
भादाेला येथे अवैध दारू जप्त
बुलडाणा : ग्रामीण पाेलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या भादाेला येथे पाेलिसांनी धाड टाकून २१०० रुपयांचा ऐवज जप्त केला. तसेच रवींद्र त्र्यंबक गवई याच्यावर कारवाई करण्यात आली. पुढील तपास पाेलीस करीत आहेत.
साखळी येथे अवैध दारू जप्त
बुलडाणा : साखळी बु. येथे सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीवर पाेलिसांनी कारवाई करून १०२० रुपयांचा ऐवज जप्त केला. तसेच राजू शंकर सनानसे याच्यावर कारवाई करण्यात आली. पुढील तपास बुलडाणा ग्रामीण पाेलीस करीत आहेत.
डाेंगरखंडाळा येथे अवैध दारू जप्त
बुलडाणा : ग्रामीण पाेलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या डाेंगरखंडाळा येथे पाेलिसांनी धाड टाकून एका महिलेवर कारवाई केली. तिच्याकडून १३५० रुपयांचा ऐवज जप्त केला. महिलेवर दारुबंदी कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. पुढील तपास बुलडाणा ग्रामीण पाेलीस करीत आहेत.
पांदण रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी
माेताळा : तालुक्यातील अनेक गावांमध्ये पांदण रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन तातडीने पांदण रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी हाेत आहे़
पुलाजवळील खड्ड्यामुळे अपघाताची शक्यता
धाड : बुलडाणा ते धाड रस्त्यावरील काेलवड येथील पैनगंगा नदीवर नुकताच पूल बांधण्यात आला आहे. पुलानजीकचा भाग दबल्याने तेथे माेठा खड्डा पडला आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज आहे़