दुबार पेरणीनंतर आता बियाणे टंचाईचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:39 AM2021-07-14T04:39:30+5:302021-07-14T04:39:30+5:30
समाधान देशमुख यांचा सत्कार किनगाव राजा : कोरोना काळात सामाजिक उत्तरदायित्व समजून समाजोपयोगी कार्य केल्याबद्दल ‘धृती फाउंडेशन, मुंबई’ यांच्यावतीने ...
समाधान देशमुख यांचा सत्कार
किनगाव राजा : कोरोना काळात सामाजिक उत्तरदायित्व समजून समाजोपयोगी कार्य केल्याबद्दल ‘धृती फाउंडेशन, मुंबई’ यांच्यावतीने सिंदखेडराजा तालुक्यातील राहेरी बुद्रुक येथील सामाजिक कार्यकर्ते समाधान देशमुख यांचा कोरोनायोद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.
प्राध्यापकांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण उत्साहात
बुलडाणा : येथील राजर्षी शाहू फार्मसी महाविद्यालयात फार्मसी क्षेत्रातील प्राध्यापकांसाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, दिल्ली यांचाद्वारे ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महाविद्यालयातील प्राध्यापकांनी सहभाग घेतला़
वझर आघाव येथे विजेचा लपंडाव
लाेणार : वझर आघाव येथे गेल्या एका महिन्यापासून विजेचा लपंडाव सुरू आहे. दिवसभर विद्युत पुरवठा बंद राहत असल्यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. याकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन तत्काळ विद्युत पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी हाेत आहे़
दमदार पावसाने पिकांना संजीवनी
देऊळगावराजा : मागील काही दिवसांपासून पावसाने उघडिप दिली होती. त्यातच दोन दिवसांपूर्वी तालुक्यातील काही भागात दमदार पाऊस पडला. त्यातच १० जुलैरोजी सायंकाळपासून, तर रात्री उशिरापर्यंत भिज पाऊस पडल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे़.
गरीब विद्यार्थ्यांना माेफत प्रवेश द्या!
बुलडाणा : काेराेनाच्या काळात गरीब विद्यार्थ्यांकडून कुठलीही फी न घेता माेफत प्रवेश देण्याची मागणी स्वाभिमानी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास आंदाेलन करण्याचा इशारा राणा चंदन यांनी दिला आहे.
‘त्या’ कुटुंबांचा कर माफ करण्याची मागणी
सिंदखेडराजा : कोरोना संसर्गाने गृहप्रमुख गमावलेल्या कुटुंबांचा कर पालिकेने माफ करावा, अशी मागणी शहर काँग्रेसच्यावतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. कोरोना संसर्गाने शहरात अनेकांचा मृत्यू झाला.