बुलडाणा : काेराेनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धाेका पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी सैलानी येथे पाेळ्याच्या दिवशी हाेणारे कार्यक्रम रद्द केले हाेते़, तसेच गर्दी न करण्याचे आदेश दिले हाेते. मात्र, पाेलिसांचा बंदाेबस्त असूनही सैलानीत ६ ऑगस्ट राेजी माेठ्या प्रमाणात गर्दी झाली हाेती़.
सैलानी येथे दरवर्षी पाेळ्याच्या दिवशी भाविक माेठ्या प्रमाणात गर्दी करतात. यावर्षी काेराेनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता प्रशासनाने पाेळासह आगामी सण साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन केले हाेते, तसेच सैलानी येथे हाेणारे कार्यक्रम रद्द केले हाेते. पाेलिसांनी सैलानी परिसरात चाेख बंदाेबस्त लावल्यानंतरही साेमवारी भाविकांनी माेठी गर्दी केली हाेती़. ,
अनेकांना मास्काचा विसर
काेराेनाचे रुग्ण कमी झाले असले तरी तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नागरिकांना काेराेनाविषयक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. सैलानी येथे आलेल्या अनेक भाविकांनी मास्कही लावलेला नव्हता़, तसेच फिजिकल डिस्टन्सिंगचाही फज्जाही उडाला हाेता़.