सिमेंट बांध फुटल्याने खरडली शेती; नुकसान भरपाई न मिळाल्याने शेतकरी हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 03:13 PM2018-05-17T15:13:24+5:302018-05-17T15:13:24+5:30

बुलडाणा : निकृष्ट बांधकाम झालेला सिमेंट साखळी बांध फुटल्यामुळे शेतकऱ्याची शेती खरडली. नुकसान भरपाई मिळविण्यासाठी शेतकऱ्याने वारंवार पाठपुरावा केला. मात्र पदरी निराशा आल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

Cultivation of the cement dam, scarf farming; The farmers have not been compensated due to non-payment of compensation | सिमेंट बांध फुटल्याने खरडली शेती; नुकसान भरपाई न मिळाल्याने शेतकरी हतबल

सिमेंट बांध फुटल्याने खरडली शेती; नुकसान भरपाई न मिळाल्याने शेतकरी हतबल

googlenewsNext
ठळक मुद्देमेहकर तालुक्यातील डोणगाव येथील शेख गुलाब शेख कासम बागवान यांची भाग २ शिवारात शेती आहे. २० जून २०१६ रोजी बांध बांधण्यात आला. मात्र हा बांध फुटून नदीकाठची शेती वाहून नुकसान झाले.

बुलडाणा : निकृष्ट बांधकाम झालेला सिमेंट साखळी बांध फुटल्यामुळे शेतकऱ्याची शेती खरडली. नुकसान भरपाई मिळविण्यासाठी शेतकऱ्याने वारंवार पाठपुरावा केला. मात्र पदरी निराशा आल्याने शेतकरी हतबल झाला आहे. मेहकर तालुक्यातील डोणगाव येथील शेख गुलाब शेख कासम बागवान यांची भाग २ शिवारात शेती आहे. त्यांच्या शेतातून काच नदी वाहते. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत या नदीवर साखळी सिमेंट बांध बांधावयाचा होता. त्याकरिता भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने शेतकऱ्याची परवानगी घेतली. २० जून २०१६ रोजी बांध बांधण्यात आला. मात्र हा बांध फुटून नदीकाठची शेती वाहून नुकसान झाले. याबाबत तक्रार केल्यानंतर नव्याने बांधकाम करण्यात आले. पुन्हा २०१७ मध्ये हा बांध फुटून शेतीचे अतोनात नुकसान झाले. तसेच पात्र मोठे होऊन शेती खराब झाली आहे. आता हा बांध न बांधल्यास पुन्हा पावसाळ्यात शेतीचे नुकसान होणार आहे. दोनवेळा बांध फुटला तरीही शेतकरी शेख गुलाब यांना भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने नुकसान भरपाई दिली नाही. नुकसान टाळण्याकरिता त्या बांधाची दुरुस्ती करण्यास सुद्धा यंत्रणा तयार नसल्याने शेतकºयासमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे.

Web Title: Cultivation of the cement dam, scarf farming; The farmers have not been compensated due to non-payment of compensation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.