एमपीएससी संयुक्त पूर्वपरीक्षेविषयी विद्यार्थ्यांना उत्सुकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:23 AM2021-06-23T04:23:12+5:302021-06-23T04:23:12+5:30
बुलडाणा : काेराेना संक्रमण आणि मराठा आरक्षणामुळे एमपीएससीची संयुक्त परीक्षा पुढे ढकलण्यात आली हाेती. मराठा आरक्षणाचा निकाल जाहीर करण्यात ...
बुलडाणा : काेराेना संक्रमण आणि मराठा आरक्षणामुळे एमपीएससीची संयुक्त परीक्षा पुढे ढकलण्यात आली हाेती. मराठा आरक्षणाचा निकाल जाहीर करण्यात आला असून, काेराेनाची दुसरी लाटही ओसरत आहे. त्यामुळे संयुक्त पूर्वपरीक्षा घेण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.
राज्यभरातील लाखाे विद्यार्थ्यांनी एमपीएससीच्या संयुक्त पूर्वपरीक्षेसाठी अर्ज भरलेले आहेत. या परीक्षांची तारीखही आयाेगाने जाहीर केली हाेती. मात्र, काेराेनाचा वाढता संसर्ग पाहता विद्यार्थ्यांनी व राजकीय पक्षांनी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली हाेती. त्यामुळे संयुक्त पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला हाेता. जून महिन्यापासून राज्यभरात काेराेना रुग्णांची संख्या कमी हाेत आहे. अनेक जिल्ह्यांत अनलाॅक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे पुढे ढकलेली संयुक्त पूर्वपरीक्षा केव्हा हाेणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. या परीक्षा सप्टेंबरपर्यंत हाेण्याची शक्यता आहे. संयुक्त पूर्वपरीक्षा तातडीने घेण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.