लाखो रुपये खर्च करुनही बांधात नाही पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2019 03:29 PM2019-12-06T15:29:46+5:302019-12-06T15:30:10+5:30

प्रकल्पामध्ये पिण्याचे पाणी आरक्षीत ठेवण्यात आले. त्यामुळे शेतीला रब्बी हंगामासाठी पाणी मिळू शकले नाही.

Dam not get water even after spending millions of rupees! | लाखो रुपये खर्च करुनही बांधात नाही पाणी!

लाखो रुपये खर्च करुनही बांधात नाही पाणी!

Next

- योगेश फरपट
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: जलसंपदा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे एकाही प्रकल्पातून शेतकऱ्यांच्या बांधावर अद्याप पाणी पोहचले नसल्याचे वास्तव आहे. त्यात कालवा दुरुस्तीच्या नावावर मात्र लाखोची बिले काढल्या गेली असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या सर्व प्रकाराची वरिष्ठांनी चौकशी करणे गरजेचे आहे.
बुलडाणा जिल्ह्यात खडकपूर्णा, नळगंगा, मन, पेनटाकळी, मस, तोरणा, ज्ञानगंगा, गोराळा असे सिंचन प्रकल्प प्रामुख्याने आहेत. गत दोन वर्षापासून जिल्ह्यात कोरडा दुष्काळ पडला. प्रकल्पामध्ये पिण्याचे पाणी आरक्षीत ठेवण्यात आले. त्यामुळे शेतीला रब्बी हंगामासाठी पाणी मिळू शकले नाही. लाखो हेक्टरवरील पिके कोमजली. शेतकºयांची मोठी हानी झाली. शेतकरी संघटनांनी हाहाकार केला. मात्र सिंचन विभागाच्या अधिकारी सोडा पण जिल्हा प्रशासनाला सुद्धा शेतकºयांची हाक ऐकू आली नाही. त्यामुळे पाणी मिळत नाही अशी शेतकºयांची धारणा झाली. अनेकांनी आपल्या शेतातून गेलेले पाट नांगराने फोडून काढले. जमीन भूईसपाट केली. विशेष म्हणजे सिंचन विभागाच्या अधिकाºयांनी या प्रकाराकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे कालव्याची मोठ्या प्रमाणात तुटफूट झाली आहे. खडकपूर्णा, नळगंगा, मन, मस प्रकल्पातून शेतीला पाणी सोडण्याचे नियोजन झाले आहे. मात्र कालव्याची दुरुस्ती अद्याप होवू शकली नाही. त्यामुळे पाणी सोडण्यात अडथळा निर्माण झाला आहे. कित्येक वर्षापासून पाटातून पाणी वाहिले नसल्याने पाटाची नासधूस झाली आहे.

पाणी वापर संस्थांचीही दिशाभूल

सिंचन प्रकल्पातून शेतकºयांना पाणी वाटप करण्यासाठी प्रत्येक गाव शिवारात एक पाणी वापर समिती कार्यान्वीत करण्यात आली आहे. जिल्हाधिकाºयांच्या मार्गदर्शनात पाणीवापर समितीची बैठकही घेण्यात आली. मात्र सिंचन विभागाच्या अधिकाºयांनी चूकीची माहिती दिल्याने पाणी वाटपास विलंब होत असल्याचा आरोप शेतकºयांनी केला आहे.

आधीच शेतकरी हतबल झाला आहे. सिंचन विभागाच्या अधिकाºयांनी पाणी वाटपाचे कुठलेही नियोजन अद्याप केलेले दिसत नाही. आधीच शेतकरी आर्थीक संकटात आहे. याची जाणिव प्रशासनाने ठेवावी.


- कैलास फाटे,जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना
कालव्याच्या दुरुस्तीची कामे सुरु करण्यात आली आहेत. काही ठिकाणी महामार्गाचा अडथळा आला आहे. त्यासंदर्भात आम्ही महामार्ग प्राधिकरणाला पत्रव्यवहार केला आहे.
- अनिल कन्ना
अभियंता,
जलसंपदा विभाग, बुलडाणा

Web Title: Dam not get water even after spending millions of rupees!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.