तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी दत्तात्रय सरकटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:35 AM2021-09-11T04:35:23+5:302021-09-11T04:35:23+5:30
ग्रामसभेत विविध ११ विषयांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये जॉबकार्ड काढणेबाबत, ग्रामसभेत १४ वा वित्त आयोग, जलयुक्त शिवार, तंटामुक्त समिती ...
ग्रामसभेत विविध ११ विषयांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये जॉबकार्ड काढणेबाबत, ग्रामसभेत १४ वा वित्त आयोग, जलयुक्त शिवार, तंटामुक्त समिती अध्यक्ष व समिती, बालसंरक्षण समिती निवड बाबत चर्चा करून निवड करण्यात आली, तर देउळगाव कुंडपाळ हद्दीतील शेत गट क्रमांक ३२३ मध्ये ठोक देशी दारूविक्रेता परवाना देण्यास व ग्रामपंचायतीकडून दारूविक्री संदर्भातील विविध प्रमाणपत्रे देण्यास ग्रामसभेने नकार दिला. ४३ लोकांनी जॉब कार्ड काढले नसल्याने त्यांनी लवकरात लवकर जॉबकार्ड काढून १०० टक्के उद्दिष्टपूर्तीस सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी ग्रामसेवक जायभाये यांनी केले. ग्रामभेस बीट जमादार धोंडगे, पोलीस कॉन्स्टेबल मोरे, पोलीस पाटील आसाराम खोमणे, विस्तार अधिकारी मुंढे, उपसरपंच विष्णू सरकटे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसभा सदस्य, महिला वर्ग उपस्थित होते.