लोणार सरोवराला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 03:48 PM2019-03-31T15:48:32+5:302019-03-31T15:48:48+5:30
लोणार : सुविधांचा अभाव, वाढते तापमान यामुळे जागतिक पर्यटनस्थळ लोणार सरोवराला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. स्थानिक हॉटेल व इतर व्यावसायिकांना याची झळ बसली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
लोणार : सुविधांचा अभाव, वाढते तापमान यामुळे जागतिक पर्यटनस्थळ लोणार सरोवराला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. स्थानिक हॉटेल व इतर व्यावसायिकांना याची झळ बसली आहे.
धार्मिक, ऐतिहासिक व वैज्ञानिक महत्व असलेले लोणार सरोवर पाहण्यासाठी देश-विदेशांतून मोठ्या संख्येने पर्यटक शहरात येतात. मात्र गेल्या वर्षभरापासून पर्यटकांच्या संख्येत मोठा परिणाम दिसून येत आहे. पर्यटनस्थळी मिळणा?्या सुविधा या अपु?्या असल्यामुळे विदेशी पर्यटकांची संख्या रोडवली आहे. दोन वर्षांपूर्वी एका हॉटेलमध्ये दिवसाकाठी दोन ते तीन पर्यटक थांबायचे; मात्र गेल्या वर्षभरापासून महिन्याकाठी पाच ते सात पर्यटक हॉटेलमध्ये थांबत असल्याने सद्य:स्थितीत देश-विदेशातील पर्यटक दुर्मिळ झाले आहेत. केवळ बोटावर मोजण्याइतकेच पर्यटक शहरात थांबत असल्याने हॉटेल व्यवसायावर परिणाम झालेला आहे. तसेच उन्हाचा वाढता पारा पाहता त्यानुषंगाने शहरात विदेशी पर्यटकांच्या सोयीसाठी काहीही व्यवस्था नाही. दुष्काळग्रस्त असलेल्या शहरात पाण्याची टंचाई आहे. यामुळे देश-विदेशातील पर्यटक लोणार सरोवराकडे पाठ फिरवत असल्याचे चित्र आहे.
विदेशी पर्यटकांकडे होतेय दुर्लक्ष
४केवळ विदेशी पर्यटकांच्या संख्येत घट झाली असे नाहीतर देशी पर्यटकही घटले आहेत. शहरासाठी आवश्यक ती दळणवळण सेवा हे या गळती मागचे मुख्य कारण असल्याचे सांगितले जात आहे. शहराला जोडणाºया रस्त्यांची अवस्था तर राज्यभर गाजते आहे. सुविधांचा अभाव व उन्हाची तीव्रता हे प्रमुख कारण असल्याने पर्यटनात घट होत असल्याचे सांगितले जाते.
४विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यास महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ कमी पडत असल्याचे दिसून येत आहे. या अनुषंगाने बोलताना पर्यटन क्षेत्राचे अभ्यासक डॉ.मापारी म्हणाले की, लोणार सरोवर पर्यटन स्थळाची जागतिक पातळीवर प्रसिद्धी कमी पडत आहे. प्रसिद्धीसाठी अधिक प्रयत्न करायला हवेत. तसे होताना दिसत नाहीत.