बुलडाणा तालुक्यातील गावकारभारी झाले निश्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:32 AM2021-02-14T04:32:08+5:302021-02-14T04:32:08+5:30
तालुक्यातील सरपंच निवडणुकीने गावोगावचे राजकारण तापले होते. तीन टप्प्यात सरपंच व उपसरपंचपदाची निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. ९ ...
तालुक्यातील सरपंच निवडणुकीने गावोगावचे राजकारण तापले होते. तीन टप्प्यात सरपंच व उपसरपंचपदाची निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. ९ फेब्रुवारी रोजी तालुक्यातील १५ गावांमध्ये सरपंच, उपसरपंचपदासाठी निवडणूक घेण्यात आली. त्यानंतर १० फेब्रुवारीला १५ गावांमध्ये आणि ११ फेब्रुवारीला २१ गावांमध्ये सरपंच, उपसरपंच पदासाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. तालुक्यात सागवन, देऊळघाट या मोठ्या ग्रामपंचायती आहेत. सागवन ग्रामपंचायतमध्ये सरपंचपदी आरती सुहास वानरे व उपसरपंचपदी देवानंद सीताराम दांडगे यांची निवड करण्यात आली आहे. डोमरुळ येथील सरपंचपदी गीता धंदर, उपसरपंचपदी गणेश तायडे, तराडखेड सरपंचपदी संजय मोरे, उपसरपंचपदी तनजिम बेग नसीम बेग, वरुड सरपंचपदी शिला बुरजे, उपसरपंचपदी रंजना पांडव, वरवंड सरपंचपदी शोभा जेऊघाले, उपसरपंचपदी दिलीप राठोड, अंभोडा सरपंचपदी विद्या भुसारी, उपसरपंचपदी कांता पवार, भादोला सरपंचपदी प्रमोद वाघमारे, उपसरपंचपदी खाँ अमिन खाँ रहिम खाँ, बोरखेड सरपंचपदी आशा जाधव, उपसरपंचपदी विठ्ठल गवळी, चौथा सरपंचपदी शारदा गायकवाड, उपसरपंचपदी अलका बिबे, धाड सरपंचपदी सय्यद खतुनबी गफ्फार, उपसरपंचपदी अर्जुन तायडे, धामणगाव सरपंचपदी दुर्गाबाई सुरडकर, उपसरपंचपदी समाधान पायघन, जामठी सरपंचपदी बिलाल शब्बीर गायकवाड, उपसरपंचपदी नंदाबाई नरोटे, जनुना सरपंचपदी वर्षा मुत्रे, उपसरपंचपदी बारवाळ टायगर, केसापूर सरपंचपदी किरण बिल्लारी, उपसरपंचपदी दिलीप निकम, खुपगाव सरपंचपदी शारदा जाधव, उपसरपंचपदी श्रीकृष्ण इंगळे, सावळी सरपंचपदी तेजराव नरवाडे, उपसरपंचपदी दुर्गाबाई वाघ, कुलमखेड सरपंचपदी चंदनबाई मोरे, उपसरपंचपदी किशोर कानडजे, कुंबेफळ सरपंचपदी मीना बुधवत, उपसरपंचपदी एकनाथ वाघ, मढ सरपंचपदी अंजना केदारे, उपसरपंचपदी प्रशांत काळे, माळविहीर सरपंचपदी अर्चना आडवे, उपसरपंचपदी सविता आडवे, माळवंडी सरपंचपदी शारदा वाघ, उपसरपंचपदी अशोक चव्हाण, दुधा सरपंचपदी धनेश निकम, उपसरपंचपदी मंदा सोनुने यांची निवड करण्यात आली आहे.
२३ गावचे सरपंच अविरोध
बुलडाणा तालुक्यातील दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यामध्ये २३ गावातील सरपंचाची निवड अविरोध झाली आहे. यामध्ये तराडखेड, वरूड, अंभाडा, बोरखेड, चौथा, धाड, धामणगाव, जामठी, जनुना, केसापूर, खुपगाव, सावळी, कुलमखेड, कुंबेफळ, माळविहिर, माळवंडी, दुधा येथील गावांचा समावेश आहे. अजिसपूर येथील सरपंचपद रिक्त आहे. येथे उपसरपंचपदी बाळाभाऊ जगताप यांची निवड झाली. दुसऱ्या टप्प्यात अविरोध आलेल्या सरपंचामध्ये देवपूर येथे वर्षा वारे, सिंदखेड मनीषा बिल्लारी, जांब दीपाली सुसर, पळसखेड भट कौशल्याबाई खेडेकर, पळसखेड नागो मालती राठोड, रायपूर सरपंचपदी सीमा देशमाने, सातगाव म्हसला राधा देठे अविरोध आल्या आहेत.