लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: शंभर मिटरच्या आत दुकान लावण्यास प्रशासनाकडून प्रतिबंध घालण्यात आला आहे. त्यामुळे गुरूवारी नगर पालिका प्रशासनाकडून भाजीपाला आणि फळविक्रीच्या दुकानांसाठी स्थळ निरिक्षण करण्यात आले. त्यानंतर संबंधित जागांवर दुकाने लावण्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र, बसस्थानक चौकातील विक्रेते आजूबाजूलाच बसल्याचे निदर्शनास आल्यानंतर शुक्रवारी दुपारी साडेचार वाजता बसस्थानकावरील फळांची दुकाने हटविण्यात आली.आपातकालीन परिस्थितीत खामगाव शहरात भाजी विक्रीसाठी १०० तर फळ विक्रीसाठी २५ दुकानांसाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. या व्यक्तीरिक्त कुठेही भाजी आणि फळविक्री करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. दरम्यान, गुरूवारी सूचना दिल्यानंतर शुक्रवारी बसस्थानकानजीकच्या भाजी विक्रीच्या दुकानालगतच फळ विक्री केल्या जात असल्याचे मुख्याधिकारी धनंजय बोरीकर यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी लागलीच ही दुकाने हटविण्याची कारवाई केली. मुख्याधिकाऱ्यांच्या कानउघडणीनंतर धावाधाव!शंभर मीटरच्या आत दुकाने लावण्यात आल्यानंतर मुख्याधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सुरूवातीला ग्राहक आल्याची समजूत झाल्याने फळ विक्रेते निश्चिंत होते. मात्र, मुख्याधिकाऱ्यांनी त्यांची कानउघडणी सुरू करताच फळविक्रेत्यांची धावाधाव सुरू झाली. त्याचवेळी मुख्याधिकारी बसस्थानक चौकात पोहोचल्याचे समजताच अग्निमशन, आरोग्य आणि अतिक्रमण विभागाचे अधिकारी आणि कर्मचाºयांची चांगलीच धावाधाव झाली.अतिक्रमण, आरोग्य विभागाला धरले धारेवर!खामगावातील बसस्थानकाजवळ भाजीपाल्याच्या दुकानाजवळच फळाची दोन दुकाने लागल्याचे मुख्याधिकाºयांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी लागलीच आरोग्य आणि अतिक्रमण विभागातील संंबंधितांना घटनास्थळी पाचारण केले. संबंधित कर्मचारी येताच, त्यांची चांगलीच कानउघडणी मुख्याधिकाºयांनी केली.
शंभर मीटरच्या आत लागलेली दुकाने हटविली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 2:51 PM