दिव्यांगांचा पाच टक्के निधी खर्च करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:41 AM2021-09-09T04:41:46+5:302021-09-09T04:41:46+5:30

मेहकर : शासनाच्या निकषानुसार दिव्यांगांचा पाच टक्के निधी वाटप करणे बंधनकारक असताना तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींनी हा निधी वाटप ...

Demand for five per cent disability funding | दिव्यांगांचा पाच टक्के निधी खर्च करण्याची मागणी

दिव्यांगांचा पाच टक्के निधी खर्च करण्याची मागणी

Next

मेहकर : शासनाच्या निकषानुसार दिव्यांगांचा पाच टक्के निधी वाटप करणे बंधनकारक असताना तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींनी हा निधी वाटप केला नसल्याच्या तक्रारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे प्राप्त झाल्या. त्यानुसार २ सप्टेंबर रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने दिव्यांगांचा पाच टक्के निधी वाटप न केलेल्या ग्रामपंचायतींवर कारवाई करून त्यांना निधी वाटपाचे आदेश द्यावेत. अशा मागणीचे निवेदन गटविकास अधिकारी पंचायत समिती मेहकर यांच्याकडे देण्यात आले.

यावेळी मागण्या पूर्ण न झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने स्वाभिमानी स्टाईलमध्ये तालुक्यातील सर्व दिव्यांगांना घेऊन सर्व ग्रामपंचायतींच्या समोर व पंचायत समितीमध्ये एक आगळे वेगळे आंदोलन करण्याचा इशाराही नितीन अग्रवाल यांनी दिला. यावेळी निवेदन देतांना स्वाभिमानीचे तालुका अध्यक्ष प्रफुल्ल देशमुख, मेहकर शहर अध्यक्ष अश्फाक शाहसुद्धा उपस्थित होते.

Web Title: Demand for five per cent disability funding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.