मुंबई येथे ५ जुलै रोजी आ.डॉ. संजय रायमुलकर यांच्यासोबत स्थानिक ग्रामपंचायत सरपंच विश्वनाथ हिवराळे, उपसरपंच गणेश पाखरे, ग्रामविकास अधिकारी डी.टी.तांबारे, ग्रामपंचायत सदस्य सैय्यद महेबूब, राहुल कापसे यांनी ना.गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या समोर पाणीटंचाईची परिस्थिती मांडली. सद्यस्थितीत गावाला १९९२ मध्ये झालेल्या जानेफळ-कळंबेश्वर अशा संयुक्त नळयोजनाद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. तेव्हा आठवड्यातील तीन-तीन दिवस पेनटाकळी प्रकल्पावरून दोन्ही गावांना पाणीपुरवठा होत असतो, परंतु सध्याची दोन्ही गावांत वाढलेली लोकसंख्या, तसेच गावाचा वाढलेला विस्तार पाहता, २९ वर्षांपूर्वी झालेली संयुक्त नळयोजना तुटपुंजी ठरत असून, ८-८ दिवस नळाद्वारे पाणी मिळत नाही. त्यामुळे जानेफळ गावासाठी स्वतंत्र नळयोजना मंजूर करण्यात यावी, अशी मागणी त्यांच्याकडे करण्यात आली.
पाणीपुरवठ्याबाबत चर्चा
जानेफळ येथील पाणीपुरवठ्याबाबत पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली, तसेच याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी आ.डॉ.संजय रायमुलकर यांच्यासह स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना दिले आहे.