कृषीदुतांनी दिले चारा प्रक्रियेचे प्रात्यक्षिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:38 AM2021-08-24T04:38:43+5:302021-08-24T04:38:43+5:30
वाळलेल्या चाऱ्यावर युरियाची प्रक्रिया केल्यामुळे चाऱ्याची पचनीयता वाढण्यास मदत होते. प्रक्रियेमुळे चाऱ्याची चव सुधारल्याने जनावरे चारा आवडीने खातात व ...
वाळलेल्या चाऱ्यावर युरियाची प्रक्रिया केल्यामुळे चाऱ्याची पचनीयता वाढण्यास मदत होते. प्रक्रियेमुळे चाऱ्याची चव सुधारल्याने जनावरे चारा आवडीने खातात व चाऱ्यातील पोषक द्रव्याचे प्रमाणही सुधारते. दुभत्या व कामाच्या जनावरांची प्रकृती सुदृढ राहण्यासाठी व दुभत्या जनावरांपासून दूध मिळविण्यासाठी व त्यांच्या शरीराची समाधानकारक वाढ होण्यासाठी त्यांना समतोल आहार देणे आवश्यक आहे. खरीप हंगाम वगळता जनावरांना हिरवा चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध होत नाही. अशावेळी भाताचा पेंडा तसेच गव्हाचे काड यांचा वाळलेला चारा मोठ्या प्रमाणात जनावरांना दिला जातो. वाळलेला चारा कठीण व तंतुमय असून, त्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण अतिशय कमी असते. या चाऱ्याची पचनीयता व चवही समाधानकारक नसते. अशावेळी जनावरांचे पोषणद्रव्यांच्या कमतरतेमुळे कुपोषण होते. त्यामुळे जनावरांना पशुखाद्यासारखा महागडा पोषणआहार द्यावा लागतो. त्यामुळे चारा प्रक्रिया केल्याने व प्रक्रिया केलेला चारा जनावरांना दिल्याने त्यांची पोषणाची तसेच प्रथिनयुक्त आहाराची गरज पूर्ण होते. अशी माहिती कृषीकन्येने दिली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य नितीन मेहेत्रे, रावे समन्वयक मोहजितसिंग राजपूत तसेच पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग प्रमुख प्रा. श्वेता धांडे व प्रा. सचिन गोरे यांचे मार्गदर्शन लाभले.