लोकमत न्यूज नेटवर्कचिखली: तालुक्यातील भोरसाभोरसी येथील एका १४ वर्षीय मुलीला औरंगाबाद येथील उपचाराअंती डेंग्यू झाल्याचे निदान झाल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, याची द खल घेऊन आरोग्य विभागाने तातडीने उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.भोरसाभोरसी येथील साक्षी या १४ वर्षीय मुलीला ९ ऑक्टोबर रोजी डेंग्यूची लक्षणे आढळून आल्याने औरंगाबाद येथील हेडगेवार रुग्णालयात भरती करण्यात आले होते. तेथे तिला डेंग्यू झाल्याचे निदान झाल्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, बदलत्या वातावरणामुळे व पावसामुळे गावात सर्वत्र घाण पाणी साचले असून डासांचे प्रमाण मोठय़ा प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे गावात तातडीने उपाययोजना राबविण्यात येऊन डेंग्यूविरोधी औषधाची फवारणी करण्यात यावी व एकलारा प्राथमिक आरोग्य केंद्रांने याकडे विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी गणेश भुसारी, एन.टी. भुसारी, रामेश्वर भुसारी, शे. बिसमिल्ला, आयुब, शे. युनुस, देवेंद्र भुसारी, नारायण आकाळ, प्रताप ढोरे यांनी केली आहे.
भोरसाभोरसी येथे डेंग्यूचा रुग्ण आढळला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 1:26 AM
चिखली: तालुक्यातील भोरसाभोरसी येथील एका १४ वर्षीय मुलीला औरंगाबाद येथील उपचाराअंती डेंग्यू झाल्याचे निदान झाल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, याची द खल घेऊन आरोग्य विभागाने तातडीने उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
ठळक मुद्देएका १४ वर्षीय मुलीला उपचारादरम्यान डेंग्यू झाल्याचे निदान आरोग्य विभागाने तातडीने उपाययोजना राबवाव्यात - ग्रामस्थांची मागणी