शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
2
महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
4
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
5
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
6
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: नांदेड पोटनिवडणुकीत अखेर काँग्रेसचा विजय; रविंद्र चव्हाण यांचा १४५७ मतांनी विजय
7
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
8
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
9
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
10
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
11
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
12
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
13
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
14
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
15
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
16
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
17
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
18
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"

देऊळगावराजा@ ९३.७७ टक्के; पाच शाळांचा १०० टक्के निकाल

By admin | Published: June 14, 2017 12:47 AM

उत्कृष्ट निकालाची यशस्वी परंपरा : तालुक्यात हर्ष चेकेला सर्वाधिक गुण

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊळगावराजा : शहरातील स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी हर्ष श्रीकृष्ण चेके याने इयत्ता दहावीत ९८.६० टक्के गुण संपादन करत तालुक्यातून सर्वप्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे. एकूण तालुक्याचा निकाल ९३.७७ टक्के लागला. यात २११७ विद्यार्थ्यांनी यश संपादीत केले असून, ५४४ विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत, ८९७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ६२४ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर १०६ विद्यार्थी केवळ पास झाले.देऊळगावराजा हायस्कूल देऊळगावराजामधून ४९० पैकी ४७५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, किरण रामदास ठाकरे, योगेश्वर सुधाकर आरमाळ या दोघांनी संयुक्तपणे ९८.२० टक्के गुण मिळवत शाळेत प्रथमस्थानी येत यश संपादन केले. द्वितीय स्थानी तीन विद्यार्थी असून, श्वेता भगवान खरात, प्रसाद भगवानदास तोष्णीवाल पायल रमेश वायाळ यांना समान ९७.६० टक्के गुण मिळाले आहेत. तृतीयस्थानी अजिंक्य सुखदेव वरगणे, शिवकुमार अरुण सोनुने, विकास रामदास गायकवाड या तिघांनीही समान ९७.२० टक्के गुण संपादीत केले आहेत. दे.राजा हायस्कूलमधून गणित विषयात १२ विद्यार्थ्यांना तसेच विज्ञान विषयात एका विद्यार्थ्याला १०० पैकी १०० गुण आणि ४९ विद्यार्थ्यांनी ९० टक्के पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. उत्तीर्ण ४७५ पैकी प्राविण्य श्रेणीत १९०, प्रथम श्रेणी १५८ द्वितीय श्रेणीत ९८ विद्यार्थी आहेत. शाळेचा निकाल ९६.९४ टक्के लागला असून, संस्थेचे अध्यक्ष जुगलसेठ धन्नावत व्यवस्थापक ओमसेठ धन्नावत, सचिव सुबोध, मिश्रीकोटकर, प्राचार्य एम.आर.थोरवे व शिक्षकांनी गुणवतांचा सन्मान केला.शहरातील स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९७ टक्के लागला असून, नेत्रदीपक कामगिरी करत हर्ष श्रीकृष्ण चेके या विद्यार्थ्याने ९८.६० टक्के गुण प्राप्त करत नावलौकिक उंचावला. द्वितीय स्थानी अपूर्व अविनाश भोयर, तेजस सुधाकर सस्ते यांना समान ९७.८० टक्के गुण मिळाले. तृतीय स्थानी गणेश शेषराव शेळके सुदर्शन मुरलीधर वायाळ यांना समान ९५.६० टक्के गुण मिळाले. अजय प्राण राठोड ९४ टक्के, प्रतीक्षा किशोर उदासी ९२.४०, वैभव रामेश्वर शिंगणे ९१.८०, प्रदीप गंभीर वरगणे ९० टक्के यांनी सुयश प्राप्त केले. शाळेतून नऊ विद्यार्थ्यांनी ९० टक्के पेक्षा जास्त गुण संपादीत केले. संस्थेचे अध्यक्ष डॉ.रामदास शिंदे, नगराध्यक्ष सुनीता शिंदे व संचालक मंडळाचे पदाधिकारी, मुख्याध्यापक व शिक्षकांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला.म्युनिसिपल श्री शिवाजी हायस्कूलचे मराठी विभागात यशाची परंपरा कायम राखत दुर्वा विलास अहिरे या विद्यार्थ्यानीने ९६ टक्के गुण मिळवत प्रथम स्थान पटकावले. द्वितीय स्वराज हरीश मोरे ९५.८० यांनी यश मिळविले. शाळेचा निकाल मराठी ९१.२८, उर्दू विभागाचा निकाल ९३.४४ टक्के आहे. उर्दू विभागात नुसरत जहां नसिरखान ८१.२०, लुबना आफरीन शे.शब्बीर ८१.२०, मुस्मान बानो शरीफ कलाल ८१ टक्के, कुलसुमबीशे. इस्माईल ७९.४०, शोएब शाह नसीर शाह ७७.६० यांनी यश मिळविले. मराठी विभागात २६४ पैकी २४१ तर उर्दू विभागात ६१ पैकी ५७ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले. गुणवंत विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक चव्हाण, पर्यवेक्षक, शिक्षक समिती सभापती पल्लवी मल्हार वाजपे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव केला. आमोना अजीज उर्दू हायस्कूलचा निकाल ९७.५० टक्के लागला असून, रेशमा बेगम शे.रफीक हिने ८६.२१ टक्के गुण घेत प्रथम स्थानी आहे. मैसरा परवीन अहमद खान ८१ टक्के, मारिया परवीन वाहेदखान ८१ टक्के, सिराजखान सादीक खान पठाण ७७.६० टक्के, फुरकान अहमद अ.रज्जाक ७७.४०, अंजुम परविन मो.नासेर ७७.२० यांनी यश मिळवले. संस्थेचे पदाधिकारी हाजी आलमखां कोटकर, इनापतखान कोटकर, अल्ताफ कोटकर, काशिफ कोटकर यांनी गुणवंताचे कौतुक केले.