वंचित बहुजन आघाडीची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:40 AM2021-09-14T04:40:38+5:302021-09-14T04:40:38+5:30

अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष नीलेश जाधव हे होते. राज्य कार्यकारणीने दिलेल्या आदेशानुसार या बैठकीमध्ये प्रत्येक तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्था सत्ता संपादन ...

Deprived Bahujan Front meeting | वंचित बहुजन आघाडीची बैठक

वंचित बहुजन आघाडीची बैठक

Next

अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष नीलेश जाधव हे होते. राज्य कार्यकारणीने दिलेल्या आदेशानुसार या बैठकीमध्ये प्रत्येक तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्था सत्ता संपादन अभियानाला सुरुवात करून गाव तिथे शाखा शुभारंभ लवकरच या कार्यक्रमाला सुरुवात करू, अशी माहिती जिल्हाध्यक्ष नीलेश जाधव यांनी याप्रसंगी दिली. या वेळी तालुका अध्यक्ष यांच्याकडून केलेल्या कामाचा अहवाल घेऊन सत्ता संपादन अभियान यशस्वी करण्यासाठी महत्त्वपूर्ण सूचना देऊन सत्ता संपादन अभियान मेळाव्याला २१ सप्टेंबरपासून बुलडाणा येथून सुरुवात होणार आहे. या अभियानात प्रत्येक गावामधून किमान १० प्रतिनिधी व त्यांची ॲानलाईन सदस्य नोंदणी अभियानाबाबत सूचना बैठकीमध्ये देण्यात आल्या.

यावेळी जिल्हा महासचिव विष्णू उबाळे, जिल्हा महासचिव प्रशांत वाघोदे, जिल्हा विधी सल्लागार ॲड. अमर इंगळे यांनी मार्गदर्शन केले. या वेळी जिल्हा संघटक बाला राऊत, अशोक सुरळकर, दत्ता राठोड, समाधान जाधव, विद्याधर गवई, महेश देशमुख, रमेश आंबेकर, आबाराव वाघ, शेषराव मोरे, रवींद्र मिसाळ, तालुकाध्यक्ष श्रीकांत जाधव, संजय धुरंधर, उद्धव वाकोडे, युवराज भिडे, मोबीनभाई, मधुकर शिंदे, बालू म्हस्के, ब्रम्हा पाडमुख, किशोर पाडमुख, डॉ. दाभाडे, वसंता वानखेडे, राजेश राठोड, बाळू भिसे, गौतम गवई, संदीप लहाने, मनोज खरात, मिलिंद वानखेडे, दीपक सोनपसार यांच्यासह जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Deprived Bahujan Front meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.