धाडच्या सरपंच खातुनबी सय्यद यांची निवड रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:41 AM2021-09-07T04:41:54+5:302021-09-07T04:41:54+5:30
बुलडाणा : जातवैधता प्रमाणपत्र एक वर्षाच्या आत सादर न केल्याने धाड येथील सरपंच खातूनबी सय्यद गफार यांची निवड जिल्हाधिकाऱ्यांनी ...
बुलडाणा : जातवैधता प्रमाणपत्र एक वर्षाच्या आत सादर न केल्याने धाड येथील सरपंच खातूनबी सय्यद गफार यांची निवड जिल्हाधिकाऱ्यांनी ६ सप्टेंबर राेजी रद्द केली आहे. जालना येथील जातपडताळणी समितीने खातून बी यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आले हाेते.
धाड ग्रामपंचायतच्या निवडणुकीत प्रभाग क्र. ४ मधील सर्वसाधारण महिला जाेगवर खातूनबी सय्यद गफार या निवडून आल्या आहेत. सरपंचपद अनुसूचित जातीसाठी राखीव असताना खातूनबी सय्यद गफार यांनी जातवैधता प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव सादर केल्याची पावती दाखवून सरपंचपदाची निवडणूक लढवली. त्यामध्ये त्या निवडून आल्या. खातूनबी सय्यद यांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती जालना यांच्याकडे उपविभागीय अधिकाऱ्यांनी निर्गमित केलेला जातीचा दाखला सादर केला हाेता. हा दाखला जात पडताळणी समितीने रद्द केला आहे. निवडून आल्यानंतर १२ महिन्याच्या कालावधीत जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. मात्र खातुनबी यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरविले आहे. त्यामुळे, त्यांची धाड ग्रामपंचायतच्या अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या सरपंचपदावर झालेली निवड पूर्वलक्ष्यी प्रभावाने रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी दिले आहेत.