सेतू विभागातून ३१ हजार प्रमाणपत्राचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 05:07 AM2021-02-28T05:07:07+5:302021-02-28T05:07:07+5:30

कोरोना विषाणूंच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक शासकीय कामेही प्रभावित झाली होती. लाॅकडाऊनच्या काळात विद्यार्थी व शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, ...

Distribution of 31 thousand certificates from Setu department | सेतू विभागातून ३१ हजार प्रमाणपत्राचे वितरण

सेतू विभागातून ३१ हजार प्रमाणपत्राचे वितरण

Next

कोरोना विषाणूंच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक शासकीय कामेही प्रभावित झाली होती. लाॅकडाऊनच्या काळात विद्यार्थी व शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, म्हणून मेहकर तहसीलच्या सेतू विभागातून वर्षभरात ३१ हजार ४२५ प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. सद्यपरिस्थितीत ४ हजार १०३ प्रमाणपत्रावर पूर्णत्वास आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षी लॉकडाऊन करण्यात आले होते. यामध्ये जीवनावश्यक वस्तू व आरोग्य सेवा सोडून इतर सर्व आस्थापना बंद करण्यात आले होते. आपले सरकार सेवा केंद्र व महा-ई-सेवा केंद्र सुद्धा अनेक वेळा बंद करण्यात आले होते. अशा स्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कामकाजासाठी लागणारे विविध प्रमाणपत्र यासोबतच शेतकऱ्यांना आवश्यक असलेली प्रमाणपत्रे यामध्ये उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, वय राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, अल्पभूधारक प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर, विशेष सहाय्य योजना प्रमाणपत्र, शेतकरी प्रमाणपत्र, अर्थ कुटुंब सहाय्य योजना प्रमाणपत्र, भूमिहीन प्रमाणपत्र, महिला आरक्षण प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रमाणपत्र यासारखे विविध प्रमाणपत्राची आवश्यकता असते. मात्र गेल्या वर्षभरामध्ये लाॅकडाऊन जाहीर करण्यात आल्याने महा ई सेवा केंद्र आपले सरकार सेवा केंद्र बंद होते. यामुळे विद्यार्थी व शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. अशा परिस्थितीतही महसूल विभागातील सेतू विभागाने विद्यार्थी व शेतकऱ्यांना ३१ हजार ४२६ प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले आहे. उपविभागीय अधिकारी गणेश राठोड, तहसीलदार डाॅ. संजय गरकल यांच्या मार्गदर्शनात या विभागांमध्ये एस.एन. कोकणे, जी. राठोड व आशा शिराळे हे काम पाहत आहेत.

कोट....

लॉकडाऊन शिथिल झाल्यावर शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. यावेळी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी विविध प्रमाणपत्राची आवश्यकता असल्याने सेतू विभागात एकाचवेळी प्रमाणपत्राची आवक वाढली होती. यावर तत्काळ कारवाई करीत प्रमाणपत्राचे वितरण विनाविलंब करण्यात आले. महा-ई-सेवा केंद्राच्या व आपले सरकार सेवा केंद्राच्या संचालकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम पाळून काम करावे.

वाय. ऐ. परळीकर, निवासी नायब तहसीलदार, सेतू विभाग, मेहकर.

Web Title: Distribution of 31 thousand certificates from Setu department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.