अतिवृष्टग्रस्त ९३ कुटुंबांना मदतीचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:38 AM2021-09-21T04:38:08+5:302021-09-21T04:38:08+5:30
याप्रसंगी बोलताना आ. संजय गायकवाड यांनी सांगितले की, ७ सप्टेंबर रोजी झालेला अतिवृष्टीमुळे तालुक्यातील सहा प्रकारचे नुकसान झालेले आहे. ...
याप्रसंगी बोलताना आ. संजय गायकवाड यांनी सांगितले की, ७ सप्टेंबर रोजी झालेला अतिवृष्टीमुळे तालुक्यातील सहा प्रकारचे नुकसान झालेले आहे. ना. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी या भागाला भेटी देऊन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिल्या जाईल सांगितलेले होते. लवकरच नुकसान झालेल्या सर्व पिकांचा सर्व्हे करून नुकसानग्रस्तांना मदत केली जाईल. काही ठिकाणी चुकीचे सर्व्हे झालेले आहेत तर काही ठिकाणी ग्रामसेवक व तलाठी यांच्या हलगर्जीमुळे व्यवस्थित सर्व्हे झालेले नाहीत. त्यामुळे त्या भागाचा पुन्हा सर्व्हे करण्यात येईल व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत केली जाईल असे सुद्धा त्यांनी यावेळी सांगितले. आ.गायकवाड यांनी ७ सप्टेंबर रोजी जो शब्द दिला होता तो पाळत ९३ कुटुंबांना सानुग्रह वाटप केले. या वेळी तालुक्यातील सर्व शिवसेना, युवासेना, महिला आघाडी इत्यादी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.