नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना धान्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:26 AM2021-06-06T04:26:24+5:302021-06-06T04:26:24+5:30
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर वाटिकेत आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस श्याम उमाळकर हे होते. ...
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर वाटिकेत आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस श्याम उमाळकर हे होते. भीमशक्तीचे राज्य सरचिटणीस भाई कैलास सुखधाने यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मेहकर विधानसभा मतदारसंघाचे पक्षनेते ॲड. अनंतराव वानखेडे, माजी नगराध्यक्ष विलासराव चनखोरे, शहराध्यक्ष कलिम खान, युनूस पटेल, महिला शहराध्यक्ष आरती दीक्षित, ॲड. गोपाल पाखरे, प्रा. संजय वानखेडे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. शाम उमाळकर यांनी आपल्या भाषणामध्ये प्रदेश अध्यक्ष नाना भाऊ पटोले यांच्या कार्यकौशल्याची माहिती देऊन नानांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष नंबर वन राहील असे सांगितले. तसेच भीमशक्तीचे भाई कैलास सुखधाने व संजय वानखेडे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे तोंडभरून कौतुक केले. समाजाने अशा कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन केले. दरम्यान, याच कार्यक्रमात काँग्रेसचे युवा नेते छोटू भाई गवळी यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने सत्कार करण्यात आला. या वेळी नारायण पचरवाल, आशुतोष तेलंग, मुनफ खान, सुखदेव ढाकरके, नारायण इंगळे, संतोष सरदार, आकाश अवसरमोल, विजय जाधव, दलितांनद गवई, सुनील कांबळे, राम भाऊ सुरुशे, डोंगरदिवे यांच्यासह असंख्य महिला, पुरुष उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संजय वानखेडे यांनी, तर आभार नारायण इंगळे यांनी मानले़