गरजू कुटुंबांना किराणा साहित्याचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:35 AM2021-05-09T04:35:40+5:302021-05-09T04:35:40+5:30

जानेफळ : काेराेना संक्रमण वाढत असल्याने राज्यभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे़ संचारबंदी व कडक निर्बंधामुळे हातावर ...

Distribution of groceries to needy families | गरजू कुटुंबांना किराणा साहित्याचे वाटप

गरजू कुटुंबांना किराणा साहित्याचे वाटप

Next

जानेफळ : काेराेना संक्रमण वाढत असल्याने राज्यभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे़ संचारबंदी व कडक निर्बंधामुळे हातावर पाेट असणाऱ्यांचे हाल हाेत आहे़ अशा कुटुंबांना संताेष राजपूत यांनी १२ हजार रुपयांचे किराणा साहित्य तर विजय जाधव यांनी प्रत्येकी ५०० रुपयांची मदत घरपाेच जाऊन केली़ या मदतीमुळे ५० गरजू कुटुंबांना आधार मिळाला़

कोरोना महामारीचा प्रकोप झपाट्याने वाढत असल्याने त्याला आटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत़ त्यामुळे हातावर पोट असलेल्या कुटुंबांची प्रचंड ओढतान हाेत आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांची होणारी अवस्था बघून येथील सुमारे ५० गरजू कुटुंबांना संतोष राजपूत यांनी १२०० रुपयाचे किराणा साहित्य तर विजय जाधव यांनी प्रत्येकी ५०० रुपयांची मदत घरपोच सुपूर्द केली आहे. ७ मे राेजी जानेफळ येथील गरीब गरजू कुटुंबांचा शोध घेऊन संतोष राजपूत यांनी तेल,साखर,मिठ,गव्हाचे पीठ, तांदूळ इत्यादी असा १२०० रुपयाचा किराणा माल तर त्यांच्या सोबतच विजय जाधव यांनी नगदी ५०० रुपये याप्रमाणे सोबतच घरोघरी जाऊन गरजू कुटुंबांना मदत दिली. गरिबी सोसलेल्या या दोघांनी दररोज रोज मजुरी करून जीवन जगणाऱ्या गरीब कुटुंबांची काय अवस्था असते हे स्वतः अनुभवलेले आहे़ मागीलवर्षी लॉकडाऊन दरम्यान सुद्धा अनेक गरजू कुटुंबांना किराणा साहित्य तसेच नगदी स्वरूपात त्यांनी मदत केली होती. गत काही दिवसांपूर्वीच संतोष राजपूत हे कोरोनावर मात करून सुखरूप घरी परतल्यानंतर त्यांनी हा किराणा साहित्य वाटपाचा उपक्रम सुरु केला आहे़ यावेळी किराणा साहित्य वाटप प्रसंगी जानकीराम मांजरे,शेख शाहरुख,किसना थोरात, गोपाल करवंदे यांनी सहकार्य केले.

Web Title: Distribution of groceries to needy families

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.