जिल्ह्यात ७० कोटींचे पीककर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:37 AM2021-05-08T04:37:14+5:302021-05-08T04:37:14+5:30

--‘त्या’ शेतकऱ्यांचे काय? कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांची जिल्ह्यातील संख्या २० हजार आहे. या शेतकऱ्यांनी अद्याप आधार प्रमाणीकरण केलेले ...

Distribution of peak loan of Rs. 70 crore in the district | जिल्ह्यात ७० कोटींचे पीककर्ज वाटप

जिल्ह्यात ७० कोटींचे पीककर्ज वाटप

Next

--‘त्या’ शेतकऱ्यांचे काय?

कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांची जिल्ह्यातील संख्या २० हजार आहे. या शेतकऱ्यांनी अद्याप आधार प्रमाणीकरण केलेले नाही. त्यामुळे त्यांना पीककर्ज देण्याचा प्रश्न बँकांना सतावत आहे. यासोबतच पीककर्ज पुनर्गठनाबाबत अद्याप वरिष्ठस्तरावरून अग्रणी बँकेला सूचना आलेल्या नाहीत. त्यामुळे पुनर्गठनाचा प्रश्नही सध्या कायम आहे.

--जिल्हा बँकेने केले १८ टक्के कर्ज वाटप--

जिल्हा बँकेनेही गेल्या दोन वर्षांपासून पीककर्ज वाटप सुरू केले असून, यावर्षी जिल्हा बँकेला ६६ कोटी रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. त्यापैकी २,३२९ शेतकऱ्यांना बँकेने आतापर्यंत १५ कोटी ३९ लाख १२ हजार रुपयांचे पीककर्ज वाटप केले आहे. उद्दिष्टाच्या १८ टक्के हे पीककर्ज वाटप करण्यात आले असून, १,३०० शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाचे बँकेला उद्दिष्ट देण्यात आले आहे.

--पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट --

बँका शेतकरी उद्दिष्ट साध्य

सार्वजनिक क्षेत्रातील बँका ९७,६५० ९०४ कोटी २९.९४ कोटी

खासगी बँका ४,३५० ८२ कोटी ३.२४ कोटी

ग्रामीण बँका २५,००० २४८ कोटी २२.३७ कोटी

जिल्हा बँक १३,००० ६६ कोटी १५.३९ कोटी

Web Title: Distribution of peak loan of Rs. 70 crore in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.