बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाच्या उद्रेकाला जिल्हाधिकारीच जबाबदार : आमदार फुंडकर यांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 07:36 PM2020-07-01T19:36:12+5:302020-07-01T19:36:26+5:30
नियोजन शून्य धोरण कारणीभूत असल्याचा सणसणाटी आरोप भाजप जिल्हाध्यक्ष आ. अॅड. आकाश फुंडकर यांनी येथे केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : बुलडाणा जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढत्या उद्रेकाला जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सकांचे उदासिन आणि नियोजन शून्य धोरण कारणीभूत असल्याचा सणसणाटी आरोप भाजप जिल्हाध्यक्ष आ. अॅड. आकाश फुंडकर यांनी येथे केला.
खामगाव येथील विश्राम गृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी जिल्हाधिकारी आणि प्रशासकीय यंत्रणेवर हल्लाबोल चढविला. कोरोना आपातकालीन परिस्थितीत आपल्यासह जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींनी स्थानिक विकास निधीतून २३१ कोटी रूपयांचा निधी दिला. तर खामगाव येथील सामान्य रूग्णालयात कोव्हीड-१९ साथरोगामध्ये तपासणी करीता ‘ट्रू लॅब क्वाट्टरो’ मशीन उपलब्ध करून देण्यासाठी अतिरिक्त २० लक्ष रुपये दिलेत. मात्र, ही मशीन उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक गंभीर नाहीत. कोरोना आपातकालीन परिस्थितीत तीन महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतर जिल्ह्यातील रूग्णालयांमध्ये विविध सुविधा उपलब्ध नाहीत. कोरोना आपातकालीन परिस्थितीत जिल्ह्यातील नागरिकांना वाºयावर सोडणाºया जिल्हाधिकाºयांनी आपल्या बंगल्यात अनेक सुविधा नियमबाह्य पध्दतीने उपलब्ध करून घेतल्या. याचे आॅडीट केले जावे. नियोजन शून्य कारभारामुळे अकोलापेक्षाही त्या जिल्ह्याची अतिशय बिकट परिस्थिती करून जातील, यावेळी आ. फुंडकर यांनी केला.
राजपत्रित अधिकारी दबावात!
कोरोना आपातकालीन परिस्थितीत राजपत्रित अधिकाºयांसोबतच जिल्हा पोलिस अधिक्षक आणि इतर अधिकारी दबावात आहेत. जिल्हाधिकाºयांच्या अतिरिक्त मानसिक त्रासामुळे आगामी काळात काही अघटीत घडणार असल्याची भीती आहे. लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठांचे ऐकण्याची त्यांची मनस्थिती नसल्याने तक्रार करून हक्कभंग आणणार असल्याची भूमिका फुंडकर यांनी मांडली.
जिल्हाधिकारी म्हणतात नो कमेंट!
यासंदर्भात जिल्हाधिकारी सुमनचंद्रा यांच्याशी संपर्क साधला असता, आपण याबाबत प्रतिक्रीया देऊ इच्छीत नसल्याचे त्या ‘लोकमत’शी बोलताना म्हणाल्या.