लोकमत न्यूज नेटवर्कसुलतानपूर: येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील औषधे कर्मचार्याच्या निवासस्थानात आढळल्याचा प्रकार २३ सप्टेंबर रोजी उघडकीस आल्याने जि.प. सदस्य पती दिलीप वाघ यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला कुलूप ठोकत येथील प्रा.आ. केंद्राचा गलथान कारभार सुव्यवस्थित होईपर्यंत कुलूप न उघडण्याचा निर्णय घेतला होता. त्या अनुषंगाने २५ सप्टेंबरला सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र सांगळे यांनी सकाळी १0 वाजता सुलतानपूर प्रा.आ. केंद्राला भेट देऊन पाहणी करीत चौकशी केली. तसेच कर्तव्यात कसूर करणार्या अधिकारी, कर्मचार्यांना खडसावले व मुख्यालयी राहण्यास बजावले. यावेळी कर्मचार्यांना सूचना देताना डॉ. सांगळे म्हणाले प्रा.आ. केंद्रामध्ये रुग्णांचा यथोचित सन्मान करून योग्य ती सुविधा वेळीच देणे आवश्यक आहे. आनंदाने, सुखाने दवाखान्यात कोणीच येत नसतो. त्यामुळे जनतेसाठी आपण आहोत आ पल्यासाठी जनता नव्हे, याचे भान आपण ठेवायला पाहिजे. दरम्यान, २३ सप्टेंबरला घडलेल्या प्रकाराबाबत संबंधित कर्मचार्यांना तत्काळ अहवाल देण्याचे सांगितले. यावेळी दिलीप वाघ, माजी सभापती आशा झोरे, कृउबास सभापती शिवकुमार तेजनकर, डॉ. सुरेश हाडे, नारायण तेजनकर, के.के.तेजनकर, सलीमखा पठाण, मारोती सुरुशे, मन्नानखा पठाण, विजय खोलगडे, विवेक रिंढे, मिलिंद पिंपरकर, अंबादास जुमडे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन जाधव, औषध निर्माण अधिकारी व्ही.के.तेजनकर, आरोग्य सहा-क एम.एम. चंद्रशेखरसह सर्व कर्मचारी हजर होते.
चौकशीसाठी जिल्हा आरोग्य अधिकार्यांचे पथक दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 12:11 AM
सुलतानपूर: येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील औषधे कर्मचार्याच्या निवासस्थानात आढळल्याचा प्रकार २३ सप्टेंबर रोजी उघडकीस आल्याने जि.प. सदस्य पती दिलीप वाघ यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला कुलूप ठोकत येथील प्रा.आ. केंद्राचा गलथान कारभार सुव्यवस्थित होईपर्यंत कुलूप न उघडण्याचा निर्णय घेतला होता. त्या अनुषंगाने २५ सप्टेंबरला सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र सांगळे यांनी सकाळी १0 वाजता सुलतानपूर प्रा.आ. केंद्राला भेट देऊन पाहणी करीत चौकशी केली. तसेच कर्तव्यात कसूर करणार्या अधिकारी, कर्मचार्यांना खडसावले व मुख्यालयी राहण्यास बजावले.
ठळक मुद्देसहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकार्यांकडून औषध प्रकरणाची दखल