बुलडाणा : सोमवार सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात ९२२.५0 मिमी. पाऊस झाला आहे. पावसाची ही सरासरी ७0.९६ टक्के असून, सर्वाधिक म्हणजे ११४ मिमी. पाऊस बुलडाणा तालुक्यात पडला आहे. त्या खोलाखाल ९0 मिमी. पाऊस हा मेहकरमध्ये ९९ तर मोताळय़ात ९0 मिमी. पाऊस नोंदविला गेला आहे. पावसामुळे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प ह्यफुगलेह्ण असून, नदी-नालेही दुथडी भरून वाहत आहेत. वान प्रकल्पात ९१.६८ टक्के, पेनटाकळी ५७.१३ टक्के, तोरणा २९.५३ टक्के, उतावळी ७0.७४ टक्के जलसाठा निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील १४ सिंचन तलाव १00 टक्के भरले असून, १४ सिंचन तलाव हे ५0 टक्क्यांपेक्षा जास्त भरल्या गेले आहेत. ** तीन तालुक्यात अतवृष्टीजिल्ह्यात शनिवारपासून सुरू असलेल्या पावसाने रविवारी संध्याकाळी चांगलाच जोर धरला. आज सकाळी ८ वाजेपर्यंत बुलडाणा, मेहकर व जळगाव जामोद या तीन तालुक्यांमध्ये अतवृष्टी झाली. ** नळगंगा जलसाठय़ात दीड फूट वाढनळगंगा धरणाच्या पाणी पातळीत दीड फुटाची वाढ झाली असून, धरण ४६ टक्के भरले आहे. आठवडापूर्वी धरणात ३७ टक्के पाणी होते. नळगंगा धरणाची पूर्ण क्षमता ६६ फु टाची आहे. सध्या धरणामध्ये ५२ फूट पाणीसाठा आहे. पलढग प्रकल्प शंभर टक्के भरून ओव्हरफ्लो झाला आहे.नदीकाठावर राहत असलेल्या नागरिकांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. ** पैनगंगा व भोगावती नदीला पूरपैनगंगा नदीला यावर्षीच्या पावसाळ्यातील हा पहिलाच पूर असल्याने मेहकरवासीयांची पूर पाहण्यासाठी एकच गर्दी झाली होती. पैनगंगा नदीवरील पूल ब्रिटिशकालीन असून, तो केव्हाही धोकादायक ठरू शकतो, पुरामुळे या पुलावरुन वाहतूक थांबवून सर्व वाहने बायपास मार्गाने वळवावे लागले. सिंदखेडराजा तालुक्यातील भोगावती नदीला पूर आला आहे; तसेच इतर नदी-नालेही दुथडी भरुन वाहत आहेत. ** येळगाव फुल्ल.बुलडाणा शहराला पाणीपुरवठा करणार्या येळगाव धरणात १00 टक्के जलसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे या धरणाचे स्वयंचलित गोडबोले दरवाजे उघडले आहेत. बुलडाणा शहराला संपूर्ण वर्षभराच्या पाण्याची तरतूद हा प्रकल्प भरल्याने झाली आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील पाणीटंचाईचे ‘विघ्न’ दूर
By admin | Published: September 09, 2014 9:18 PM