अनोळखी माणसाला मोबाइल देऊ नका; क्षणात बँक खाते होऊ शकते साफ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:39 AM2021-08-20T04:39:41+5:302021-08-20T04:39:41+5:30
ओटीपी मिळविण्यासाठी अशी केली जाऊ शकते फसवणूक कॉल करण्यासाठी मोबाइल घेऊन अनोळखी व्यक्ती एक कॉल करायचा, तुमचा मोबाइल द्या, ...
ओटीपी मिळविण्यासाठी अशी केली जाऊ शकते फसवणूक
कॉल करण्यासाठी मोबाइल घेऊन
अनोळखी व्यक्ती एक कॉल करायचा, तुमचा मोबाइल द्या, अशी विनंती करून आपला मोबाइल घेतात आणि आपल्या मोबाइलमधून ओटीपी सहज मिळवतात.
वेगळी लिंक पाठवून
बऱ्याच वेळा आपल्या मोबाइलवर वेगळी लिंक पाठविण्यात येते. त्यावरील माहिती भरण्यासाठी समोरच्या व्यक्तीचा काॅल येतो. त्या माध्यमातून आपल्या बँक खात्याची माहिती, पासवर्ड समोरच्या व्यक्तीला सहज मिळून जातो.
लॉटरी लागली आहे,
असे सांगून...
अनेक वेळा तुम्हाला लॉटरी लागली आहे, असे सांगूनही फसवणूक केली जाते. लॉटरी लागली या खुशीत समोरची व्यक्ती आपल्या बँक खात्याची सर्व माहिती देऊन टाकते.
केवायसीसाठी आवश्यक,
असे सांगून...
केवायसीसाठी बँक खाते क्रमांक हवा आहे, यासह एटीएम नंबर, पासवर्ड अशी माहिती विचारली जाते. केवायसीसाठी अडचण येऊ नाही, यामुळे समोरची व्यक्ती आपल्याकडील सर्व माहिती देऊन टाकते.
...ही घ्या काळजी
१. लॉटरी लागल्याचे मेल किंवा मोबाइलवर संदेश आल्यावर ते उघडून पाहू नयेत. उघडले तरी त्यावर असलेल्या लिंकवर क्लिक करू नये. लिंकच्या माध्यमातून वैयक्तिक माहिती मागितली जाते.
२. अनेक जण लॉटरीच्या आमिषामुळे ती सर्व माहिती भरतात. यामध्ये बँक खात्यासंदर्भातील तसेच एटीएम पिन नंबर यासह गोपनीय माहिती मागवलेली असते, ती माहिती दिली, तर तुमच्या खात्यावरील रक्कम लंपास केली जाते.
३. फसवणूक झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल होतो. मात्र, फसवणूक होऊ नये, यासाठी सर्वांनी काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.
ऑनलाइन फसवणुकीच्या या प्रकारामध्ये शिक्षित लोकही बळी पडत आहेत. त्यामुळे समोरच्या व्यक्तींनी अनोखळी व्यक्तीला आपला मोबाइल देऊच नये, तसेच ऑनलाइन माहिती मागितल्यावरही ती देणे टाळावे, नवीन लिंक आपल्या मोबाइलवर उघडू नये, प्रत्येकाने याची खबरदारी घ्यावी.
प्रदीप ठाकूर, पोलीस निरीक्षक, सायबर विभाग, बुलडाणा