घाटावर दुष्काळाचे सावट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 08:02 PM2017-08-17T20:02:25+5:302017-08-17T20:05:19+5:30
बुलडाणा : घाटावरील सर्वच तालुक्यामध्ये मागिल अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतातील उभे पिक सुकायला लागले आहे. तर काही ठिकाणी पिकांनी माना टाकल्या असून यावर्षी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. पावसाअभावी घाटावरील तालुक्यांमध्ये दुष्काळाचे सावट निर्माण झाले असून याबाबत शासनाने सर्वे करून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विविध राजकीय पक्षांसह सामाजिक संघटनामधून वाढत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

जिल्ह्यात पेरणीच्या सुरूवातीलाच चांगल्या पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्यात ७ लाख ४८ हजार ८०० हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी करण्यात आली. सुरूवातीला झालेल्या पावसावर आतापर्यंत पिके तग धरून होती. मात्र सध्या पावसाने पाठ फिरवल्याने घाटावरील पिकांची परिस्थिती चिंताजनक आहे. पावसाअभावी घाटावरील बुलडाणा, चिखली, मोताळा, लोणार, सिंदखेड राजा, मेहकर, देऊळगाव राजा या तालुक्यांमधील लाखो हेक्टर क्षेत्रावरील पिके धोक्यात सापडली आहेत. पावसाची ही उघडीप दुष्काळाचे सावट निर्माण करत आहे.
पाऊस लांबल्याने पिकांवर परिणाम झाला असून, सोयाबीनने माना टाकल्या आहेत. तर कपाशीची पिकांचीही वाढ खुंटल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी शेतकरी पिकांना वाचविण्यासाठी टँकरने पाणी पुरवत असल्याचे चित्रही पाहावयास मिळत आहे. पाऊस येत नसल्याने शेतकºयांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. त्यामुळे पिकांची परिस्थिती पाहता, जिल्ह्यात पिकांचा सर्वेकरून दुष्काळ जाहीर करण्याची मागणीही विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व शेतकºयांकडून जोर धरत आहे.